क्रेटा, नेक्सॉन, सेल्टॉस कामातून गेल्या! ही कंपनी नवीन एसयुव्ही आणतेय, टीझर लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 03:27 PM2023-01-09T15:27:38+5:302023-01-09T15:27:55+5:30
मोठ्या रॅप-अराउंड हेडलॅम्पसह सिग्नेचर ग्रिल, क्रोम बारसह मल्टी-स्लॅट ग्रिल आणि दोन हेडलॅम्पच्या मध्यभागी एक मोठा होंडा बॅज दिसत आहे.
Honda Cars India लवकरच नवी एसयुव्ही लाँच करणार आहे. कंपनीने आज या कारचा ऑफिशिअल टीझर लाँच केला आहे. भारतात सध्या एसयुव्हींची डिमांड आहे. यामुळे कंपन्या अशा प्रकारच्या गाड्यांकडे वळल्या आहेत.
नवीन Honda SUV लाँच केल्यानंतर त्याची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara, Toyota Hyryder, VW Taigun, Skoda Kushaq आणि MG Astor सारख्या कारशी होईल. Honda ची येणारी SUV अमेझच्या प्लॅटफॉर्मच्या सुधारित आवृत्तीवर आधारित असेल. नवीन एसयूव्ही डिझेल पॉवरट्रेनसह दिली जाणार नाही. मात्र, त्यात पेट्रोल आणि हायब्रिड इंजिनचा पर्याय दिला जाऊ शकतो.
ही कार उन्हाळ्यापर्यंत येऊ शकते, असे टीझरमध्ये म्हटले आहे. Honda R&D Asia Pacific Co. Ltd. येथे ही एसयुव्ही डिझाईन करण्यात आली आहे. हे डिझाईन आणि फिचर्स भारतातील व्यापक बाजार सर्वेक्षणांवर आधारीत असल्याचे म्हटले आहे.
मोठ्या रॅप-अराउंड हेडलॅम्पसह सिग्नेचर ग्रिल, क्रोम बारसह मल्टी-स्लॅट ग्रिल आणि दोन हेडलॅम्पच्या मध्यभागी एक मोठा होंडा बॅज दिसत आहे. या कारला हेडलॅम्पच्या वर एलईडी डीआरएल लावले आहेत.