Cyrus Mistry: विनायक मेटे अन् सायरस मिस्त्रींच्या अपघातात मोठे साम्य; दोघांचाही अपघाती मृत्यू काय सांगतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 12:34 PM2022-09-05T12:34:47+5:302022-09-05T12:37:07+5:30
Cyrus Mistry, Vinayak Mete Accident: फोर्ड आणि मर्सिडीज या कंपन्या काही साध्यासुध्या कंपन्या नाहीत. त्यांचा श्रीमंत, अतिश्रीमंत लोकांमध्ये चांगलाच बोलबाला आहे. दिसण्याबरोबरच त्यांची क्वालिटीदेखील उच्चत्तम असते.
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाला. या दोन्ही महत्वाच्या व्यक्तींच्या अपघाती मृत्यूमागे दोन साम्य आहेत. पहिले म्हणजे दोघेही मधल्या सीटवर बसले होते. दुसरे म्हणजे दोघांच्याही कार या जगज्जेत्या कंपन्यांच्या दणकट समजल्या जाणाऱ्या कार होत्या.
Road Hypnosis: विनायक मेटेंचा ड्रायव्हर रोड हिप्नॉटिझमचा शिकार? काय असतो हा प्रकार
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे कार कितीही दणकट असो, वेग मर्यादेत असला पाहिजे तरच अपघातातून वाचण्य़ाची शक्यता कमी असते किंवा अपघात होण्याची शक्यता कमी असते. विनायक मेटेंचा गेल्या महिन्यात एक्स्प्रेस वेवर अपघाती मृत्यू झाला होता. ते पहाटे मुंबईला येत होते. ते मागच्या सीटवर बसले होते. त्यांच्या गाडीची अवस्था पाहता, गाडीचे मोठे नुकसान झाले नाही, परंतू आतमध्ये बेसावध बसल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मेटे यांची कार ही फोर्ड एन्डोव्हर ही जगविख्यात एसयुव्ही होती.
असाच प्रकार सायरस मिस्त्री यांच्याबाबत घडला. मिस्त्री यांची मर्सिडीजची कार होती. या गाडीलाही बंपर आणि इंजिनला नुकसान झाले आहे. गाडीचा चेंदामेंदा झालेला नाही. परंतू मेटेंसारखेच मिस्त्री बेसावध असल्याने त्यांचे सीट किंवा अन्य कोणत्यातरी वस्तूवर आदळल्याने मृत्यू झाला. मिस्त्री यांच्या मागील बाजुच्या सीटवरील एअरबॅगही उघडल्या आहेत. परंतू, ते समोरील बाजुला आदळले असणार आहेत.
या दोन्ही अपघातावरून गाडी कोणत्याही कंपनीची असो, कितीही दणकट असो, कितीही एअरबॅग असोत, तुम्ही वेग आणि तुमची सुरक्षा सांभाळलीत तरच वाचू शकता. फोर्ड आणि मर्सिडीज या कंपन्या काही साध्यासुध्या कंपन्या नाहीत. त्यांचा श्रीमंत, अतिश्रीमंत लोकांमध्ये चांगलाच बोलबाला आहे. दिसण्याबरोबरच त्यांची क्वालिटीदेखील उच्चत्तम असते. यामुळे रस्त्यावर वाहने चालविताना अती घाई किंवा अती वेगाने न चालविता वेळ लागला तरी सुरक्षित आणि कमी वेगाने चालवावी आणि सुरक्षित इच्छित स्थळी पोहोचावे.