Hero Xoom Scooter: खतरनाक! वळणावर कारसारख्या लाईट वळणार; हिरोची हाय-टेक स्कूटर झूम लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 06:51 PM2023-01-30T18:51:50+5:302023-01-30T18:52:07+5:30
हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स व स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज नवीन ११० सीसी स्कूटर – झूम लाँच केली.
हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स व स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज नवीन ११० सीसी स्कूटर – झूम लाँच केली. हिरो झूममध्ये ११० सीसी श्रेणीमधील नवीन वैशिष्ट्यांचा समावेश आहे. इंडस्ट्री-फर्स्ट वैशिष्ट्य – हिरो इंटेलिजण्ट कॉर्नरिंग लाइट (एचआयसीएल) आणि सेगमेंट-फर्स्ट – अधिक मोठे व अधिक रूंद टायर्स, ११० सीसी विभागातील गतीशील अॅक्सेलरेशन देण्यात आले आहे.
या स्कूटरमध्ये कारप्रमाणे वळणावर प्रकाश देणारे लाईट बसविण्यात आले आहेत. तसेच इंडल स्टॉप-स्टार्ट सिस्टम देण्यात आली आहे. नवीन डिजिटल स्पीडोमीटरसह ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी व साइड-स्टॅण्ड इंजिन-कट-ऑफ देण्यात आले आहे.
शीट ड्रम, कास्ट ड्रम व कास्ट डिस्क या तीन व्हेरिण्ट्समध्ये ही स्कूटर येते. या स्कूटरची किंमत 68,599 (एलएक्स - शीट ड्रम), 71,799 (व्हीएक्स - कास्ट ड्रम) आणि 76,699 (झेडएक्स – कास्ट ड्रम) एक्स शोरुम एवढी ठेवण्यात आली आहे.
यामध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प्स आणि इंडस्ट्री-फर्स्ट ‘एचआयसीएल – हिरो इंटेलिजण्ट कॉर्नरिंग लाइट’ असलेले पॅकेज देण्यात आले आहे. रूंद टायर्स, डायमंड कट अलॉई व्हील्स, इंटीग्रेअेड रिअर ग्रिप देण्यात आली आहे.
पॉवर-पॅक कार्यक्षमता
हिरो झूममध्ये ११० सीसी बीएस-६ प्रमाणित इंजिन आहे, जे उच्च कार्यक्षम राइडसाठी ७२५० आरपीएममध्ये ८.०५ बीएचपी आऊटपुट आणि ५७५० आरपीएममध्ये ८.७ एनएम टॉर्कची निर्मिती करते.
हिरो झूम पाच स्पोर्टी कलरमध्ये येते. शीट ड्रम व्हेरिएण्ट पोलस्टार ब्ल्यूमध्ये उपलब्ध आहे, कास्ट ड्रम व्हेरिएण्ट पोलस्टार ब्लयू, ब्लॅक व पर्ल सिव्हलर व्हाइटमध्ये उपलब्ध आहे. कास्ट डिस्क व्हेरिएण्ट पोलस्टार ब्ल्यू, ब्लॅक, स्पोर्टस् रेड आणि मॅट अॅब्रॅक्स ऑरेंज कलर थीम्समध्ये उपलब्ध आहे.