बाजारात येणार Datsun ची नवी सेव्हन सीटर; भल्याभल्या कारना देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 04:07 PM2018-07-31T16:07:01+5:302018-07-31T16:16:25+5:30

जपानची कार उत्पादक कंपनी असलेली Datsun लवकरच भारतातल्या एसयूव्ही मार्केटमध्ये पाऊल ठेवणार आहे.

datsun s cheap suv cross spotted during testing | बाजारात येणार Datsun ची नवी सेव्हन सीटर; भल्याभल्या कारना देणार टक्कर

बाजारात येणार Datsun ची नवी सेव्हन सीटर; भल्याभल्या कारना देणार टक्कर

googlenewsNext

नवी दिल्ली- जपानची कार उत्पादक कंपनी असलेली Datsun लवकरच भारतातल्या एसयूव्ही मार्केटमध्ये पाऊल ठेवणार आहे. कंपनीची क्रॉस प्रकारातील ही नवी कार गो, रेडी-गो आणि कॉम्पॅक्ट एमपीव्ही गो प्लसहून अत्याधुनिक असणार आहे. कंपनीनं क्रास नावाची ही कार 2016च्या ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शनासाठी ठेवली होती. आता कंपनीकडे याचं मॉडल तयार असून, सध्या कारची टेस्टिंग सुरू आहे. 

टेस्टिंगदरम्यान कार कोणाच्याही नजरेस पडू नये, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे या कारबाबत योग्य माहिती मिळू शकलेली नाही. परंतु ही कार क्रॉस आणि गो प्लसच्या प्रकारातील बेस्ट सेलर कार ठरू शकते. या कारचं एकंदरीत डिझाइन आकर्षक आहे. त्यामुळे पाहता क्षणी ती कार कोणालाही आवडू शकते. कारमध्ये स्टायलिश प्रोजेक्टर, एलईडी हेड लॅप्म्स आणि सर्क्युलर फॉग लॅम्प्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे अंधारातही ही कार जबरदस्त पळवता येते. इंटिरिअरच्या बाबतीत ही कार डॅटसनच्या गो प्लससारखीच आहे. तसेच कारमध्ये इंफोटेन्मेंट, स्टायलिश डॅशबोर्ड आणि गीअर बॉक्स देण्यात आला आहे.

या एसयूव्ही प्रकारातील क्रॉस कारमध्ये 3 सिलिंडरचे 1.2 लीटरचं मोटर इंजिन बसवण्यात आलं आहे. या प्रकारातल्या कमी किमतीतल्या गाड्यांसाठी 1 लीटरचंही इंजिन देण्यात येऊ शकते. तसेच ही कंपनीची पहिली डिझेल इंजिन कार असू शकते. परंतु अद्यापही या कारची किंमत कंपनीनं सार्वजनिक केलेली नाही.
  

Web Title: datsun s cheap suv cross spotted during testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.