Ola Electric Scooter Delivered in Pune: बोंबला! मध्यरात्री २.३० वाजता ओला स्कुटरची डिलिव्हरी, ती देखील पुण्यात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 01:37 PM2022-01-02T13:37:31+5:302022-01-02T13:48:48+5:30
Ola Electric Scooter Delivered midnight in Pune: ज्या लोकांनी ओला स्कूटर खरेदी केली आहे, त्या सर्वांना डिसेंबरमध्ये डिलिव्हरी देण्यात आली आहे. यापैकी काही मार्गावर आहेत, काही वितरण केंद्रावर पोहोचल्या आहेत आणि काही आरटीओ नोंदणी अंतर्गत आहेत, असे भाविश अग्रवाल यांनी म्हटले होते.
ओला इलेक्ट्रीक स्कूटरच्या डिलिव्हरींना सुरुवात झाली आहे. चार-पाच महिने आज-उद्या करणाऱ्या कंपनीने आता लोकांना मध्यरात्री देखील स्कूटरची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. सीईओ भाविश अग्रवाल हे दिवस रात्र एक करून अर्धवट का होईना स्कूटर ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. अशीच एक डिलिव्हरी पुण्यात करण्यात आली आहे, ती देखील मध्यरात्री अडीज वाजता.
नववर्षाच्या रात्री ही डिलिव्हरी करण्यात आली. यामुळे ग्राहकाने खुश होऊन सीईओ भाविश अग्रवाल यांचे आभार मानले आणि इमोशनल संदेश पाठविला आहे. भाविशने देखील आपल्या टीमचे आभार मानले आहेत. ओलाची ही स्कूटर पुण्याच्या शुक्रवार पेठेतील सचिन यांनी घेतली आहे. त्यांनी रात्री अडीज वाजता Ola Scooter ची डिलिव्हरी केल्याबद्दल Ola Electric च्या पुणे टीमचे आभार मानले आहेत. कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार ३१ डिसेंबरच्या रात्री ही स्कूटर देण्यात आली. माझ्या पत्नीला या स्कूटरचा रंग खुप आवडला आहे, असे सचिन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
🙏🏼Huge thanks to everyone @OlaElectric for putting in everything over last few weeks. We’ve been delivering through the new year night too. I know we’ve more to do. Many who couldn’t get deliveries will get in next days. We’re doing all things possible to get your S1 to you soon! https://t.co/Iy2sK8TIA8
— Bhavish Aggarwal (@bhash) January 1, 2022
हे कळताच भाविश यांनी देखील संधी दवडता आपल्या टीमचे आभार मानले आहेत. गेल्या काही आठवड्यांत ओला इलेक्ट्रीकच्या टीमने सारेकाही एका बाजुला ठेवले आहे. आम्ही नवीन वर्षाच्या रात्रीदेखील ओला स्कूटर डिलिव्हर केली आहे. मला माहिती आहे, आम्हाला अजून खूप काम करायचे आहे. ज्या लोकांना स्कूटर मिळालेली नाही, त्यांना पुढील काही दिवसांत मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी भाविशने सांगितले होते की, ज्या लोकांनी ओला स्कूटर खरेदी केली आहे, त्या सर्वांना डिसेंबरमध्ये डिलिव्हरी देण्यात आली आहे. यापैकी काही मार्गावर आहेत, काही वितरण केंद्रावर पोहोचल्या आहेत आणि काही आरटीओ नोंदणी अंतर्गत आहेत.
संबंधीत बातम्या...