10 ते 20 लाखांमध्ये येणाऱ्या SUV ची मागणी वाढली, शानदार फीचर्सला ग्राहकांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 01:10 PM2023-08-20T13:10:29+5:302023-08-20T13:11:27+5:30
वाहन निर्माता इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी सज्ज आहे.
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत एसयूव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. 10 ते 20 लाख रुपयांच्या श्रेणीतील एसयूव्ही (SUV) ला जास्त मागणी आहे. कारण आता एकूण प्रवासी वाहनांच्या (PV) विक्रीत एसयूव्हीचा वाटा 32 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. FY20 मध्ये, PV मार्केटमध्ये या प्राइस बँडचा वाटा 19 टक्के होता.
व्हॉल्यूम ग्रोथमुळे एसयूव्हीची पसंती वाढत आहे. जो या विभागात 74 टक्के आहे. वाहन निर्माता इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी सज्ज आहे. मारुतीने अलीकडे जिमनी ऑफ-रोडर आणि Invicto MPV ला आपल्या प्रीमियम लाइन-अपमध्ये जोडले आहे.
दरम्यान, एसयूव्ही आणि एमपीव्हीला प्राधान्य हे या सेगमेंटच्या वाढीचे एक कारण आहे. वाढत्या फीचर्समुळे लोक कारलाही जास्त पसंती देत आहेत. 10 ते 20 लाख रुपयांच्या सेगमेंटमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
Maruti Suzuki Jimny
भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी जिम्नीची (Maruti Suzuki Jimny) क्रेझ खूप दिवसांपासून होती. यावर्षी कंपनीने ऑटो एक्सपोमध्ये जिम्नी सादर केली होती. जिम्नी पाहण्यासाठी हजारोंची गर्दी झाली होती. ही कार एकूण दोन व्हेरिएंट येते. जेटा आणि अल्फा या एसयूव्हीची किंमत 12.74 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 1.5 लीटर, 4-सिलिंडर, NA पेट्रोल इंजिन मिळते, जे 103 hp पॉवर आणि 134 Nm टॉर्क जनरेट करते. कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल किंवा 4 स्पीड ऑटोमॅटिकसह जोडलेले आहे.
KIA Sonet
कियाच्या भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक म्हणजे सोनेट. या कारमध्ये तुम्हाला अनेक दमदार फीचर्स मिळतात. जर तुम्ही तिचा लुक बघितला तर तुम्हाला ही कार खूप आवडेल. या कारची सुरुवातीची किंमत 10 ते 24 लाख रुपये आहे.
Maruti Suzuki Invicto
आत्तापर्यंतची सर्वात महागडी मारुती कार मारुती सुझुकी इनव्हिक्टो आहे. ही कार जेटा+ आणि अल्फा+ ट्रिम्समध्ये सात आणि आठ-सीटर लेआउटमध्ये येते. या कारची किंमत 24.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 28.42 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारची थेट स्पर्धा टोयोटा इनोव्हा हाय क्रॉस आणि महिंद्रा XUV700 यांच्यात आहे. मारुती सुझुकी इनव्हिक्टोमध्ये 10-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, सात-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, एम्बिएंट लाइटिंगसह एक पॅनोरामिक सनरूफ, मिडल-रोच्या मागील बाजूच्या सीट्स, 8-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, सहा स्पीकर सेटअप आणि पॉवर्ड टेल गेट सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.