४० हजारांपेक्षाही कमी किमतीत लाँच झाली Detel ची इलेक्ट्रिक बाईक Easy Plus; पाहा काय आहे विशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 08:50 PM2021-03-19T20:50:18+5:302021-03-19T20:53:53+5:30

Electric Vehicle : पाहा काय आहे या बाईकमध्ये विशेष; भारतीय रस्त्यांसाठीच डिझाईन करण्यात आली बाईक

detel launches cheapest electric two wheeler easy plus priced at 39999 rupee know specifications | ४० हजारांपेक्षाही कमी किमतीत लाँच झाली Detel ची इलेक्ट्रिक बाईक Easy Plus; पाहा काय आहे विशेष

४० हजारांपेक्षाही कमी किमतीत लाँच झाली Detel ची इलेक्ट्रिक बाईक Easy Plus; पाहा काय आहे विशेष

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय रस्त्यांसाठीच डिझाईन करण्यात आली बाईकDetel Easy Plus मध्ये मिळणार पाच कलर व्हेरिअंट

परवडणाऱ्या दरात इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करणारी अशी ओळख असलेल्या Detel या कंपनीनं आपली इलेक्ट्रिक बाईक ईझी प्लस लाँच केली आहे. कंपनीनं शुक्रवारी राईड एशिया एक्स्पोमध्ये ही बाईल लाँच केली. या बाईकचं बुकींगही सुरू करण्यात आलं आहे. या बाईकची विशेष बाब म्हणजे ही B2C बाईक ग्राहकांना  www.detel-india.com या संकेतस्थळावर 1,999 रूपये देऊन खरेदी करता येऊ शकते. 

Detel च्या या टू व्हिलर बाईकमध्ये 170mm चा ग्राऊंड क्लिअरन्स मिळतो. या लो स्पीड बाईकमध्ये 20AH लिथिअम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बाईक केवळ 4 ते 5 तासांत संपूर्ण चार्ज होते. तसंच एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही 60 किलोमीटरपर्यंत ही बाईक चालवू शकता. भारतातील रस्त्यांप्रमाणे ही बाईक डिझाईन करण्यात आली असून यात मेटल अलॉय, पावर कोटेड आणि ट्युबलेस टायर देण्यात आले आहेत. या बाईकची किंमत 39,999 रूपये इतकी आहे.

Detel Easy Plus मध्ये मिळणार पाच कलर व्हेरिअंट

Detel Easy Plus ही बाईक कंपनीनं पाच कलर व्हेरिअंटमध्ये लाँच केली आहे. यामध्ये मेटॅलिक रेड, पर्ल व्हाईट, गनमेटल, मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक येलो हा कलर मिळणार आहे. Detel आपल्या प्रत्येक बाईकसह प्री पेड रोड साईड असिस्टंटही देत आहे. जर तुमची बाईक रस्त्याच्या मध्येच खराब झाली तर तुम्ही 844 844 0449 टोल फ्री क्रमांकावर कॉलही करू शकतात. त्यानंतर कंपनी एक गाडी त्या ठिकाणी पाठवून तुमची मदत करेल. 
 

Web Title: detel launches cheapest electric two wheeler easy plus priced at 39999 rupee know specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.