थंडीत कारची बॅटरी डेड झाली? मेकॅनिकशिवाय कशी स्टार्ट करावी, दोन पर्याय...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 08:51 AM2024-01-02T08:51:47+5:302024-01-02T08:52:08+5:30
जेव्हा तुम्ही कार सुरु करायला जाता तेव्हा तुम्हाला क्लिक-क्लिक-क्लिक-क्लिक-क्लिक असा आवाज येऊ लागतो.
थंडीत जशी हृदयाची टिकटिक थांबण्याचा धोका असतो तसाच धोका कारच्या बॅटरी डेड होण्याचाही असतो. अनेकांच्या कार, स्कूटर थंडीच्या दिवसात सुरुच होत नाहीत. थंडीच्या काळात अनेकांच्या वाहनांच्या बॅटरी डेड होतात. अशावेळी वाटेतच कुठेतरी किंवा घराजवळच अडकायला होते. अशावेळी कार, बाईक सुरु कशी करायची? जंप स्टार्टशिवाय पर्याय नसतो. परंतु तो कसा करावा?
जेव्हा तुम्ही कार सुरु करायला जाता तेव्हा तुम्हाला क्लिक-क्लिक-क्लिक-क्लिक-क्लिक असा आवाज येऊ लागतो. कारमधील लाईट चालू बंद किंवा कमी जास्त होऊ लागते. हे बॅटरी खराब झाल्याचे संकेत असतात. बॅटरी खराब झाल्याने खिडक्यांच्या काचा खाली-वर करणे, आतील लाईट सुरु ठेवण्यास त्रास होतो.
अशावेळी काय करायचे? एक पर्याय जंप स्टार्ट आणि दुसरा पर्याय हा ढकल स्टार्टचा आहे. जंप स्टार्ट साठी तुम्हाला दुसरी बॅटरी लागेल. तसेच वायरही लागणार आहे. दुसरी कार असेल तर तिच्या बॅटरीने कार स्टार्ट करता येऊ शकते. कार सुरु झाल्यानंतर काही वेळ ती सुरु ठेवावी.
ढकलस्टार्ट कसे कराल?
पूर्वीच्या कार या पुढे ढकलून स्टार्ट करता येत होत्या. परंतु, आताच्या कार या मागे ढकलून रिव्हर्स गिअर टाकून स्टार्ट कराव्या लागतात. पाठीमागे उतार असल्यास आणखी वेग घेता येतो, ठराविक वेगात कार आली की लगेचच रिव्हर्स गिअर टाकावा, जेणेकरून इंजिनला झटका बसतो व कार सुरु होते.