'या' महिन्यात मारुतीच्या Alto, WagonR आणि Swift सह अनेक कारवर डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 11:49 AM2023-02-07T11:49:11+5:302023-02-07T11:50:55+5:30

या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये देखील, Alto, Alto K10, WagonR, S-Presso, Swift, Dzire आणि Celerio सारख्या कारला मारुती सुझुकी एरिना शोरूममध्ये 40,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

Discount On Maruti Suzuki Cars In February 2023, See Offers On Alto K10 Wagonr Swift Dzire Celerio Eeco | 'या' महिन्यात मारुतीच्या Alto, WagonR आणि Swift सह अनेक कारवर डिस्काउंट!

'या' महिन्यात मारुतीच्या Alto, WagonR आणि Swift सह अनेक कारवर डिस्काउंट!

googlenewsNext

नवी दिल्ली : मारुती सुझुकी दर महिन्याला जास्तीत जास्त गाड्यांची विक्री करते. त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे एरिना आणि नेक्सा डीलरशिपवर विकल्या जाणार्‍या कंपनीच्या लोकप्रिय कारला चांगल्या सवलती आणि ऑफर दिल्या जात आहेत. या महिन्यात, म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये देखील, Alto, Alto K10, WagonR, S-Presso, Swift, Dzire आणि Celerio सारख्या कारला मारुती सुझुकी एरिना शोरूममध्ये 40,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. हा डिस्काउंट कॅशबॅक, कॉर्पोरेट आणि एक्सचेंज बोनसच्या माध्यमातून आहे. दरम्यान, मारुतीच्या कोणत्या कार खरेदीवर या महिन्यात किती हजारांना फायदा होऊ शकतो?

मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार अल्टो 800 वर 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. म्हणजेच अल्टो 800 च्या खरेदीवर तुम्हाला 39 हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो.  या महिन्यात अल्टो K10 वर 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3100 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे, म्हणजेच तुम्हाला एकूण 43100 रुपयांचा लाभ मिळू शकतो. तसेच, या महिन्यात मारुती सुझुकी वॅगनआर खरेदी केल्यास तुम्हाला 25,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, तसेच 15,000 एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस म्हणून 4 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.

Swift आणि Dzire वर किती मिळेल लाभ?
या महिन्यात मारुती सुझुकी आपल्या लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्टवर 25,000 रुपये कॅश डिस्काउंट, 15000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 4000 कॉर्पोरेट डिस्काउंट मिळू शकतो, याचा अर्थ स्विफ्ट विकत घेतल्यानंतर एकूण 44 हजार रुपयांचा लाभ मिळेल. याचप्रमाणे, डिझायर सेडान खरेदी केल्यावर ग्राहकांना 10,000 रुपयांच्या कॅशबॅकसोबत 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे.

S-Presso, Celerio आणि Eeco वर किती डिस्काउंट?
मारुती सुझुकी या महिन्यात आपल्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक एस-प्रेसोवर एकूण 44,000 रुपयांपर्यंतचा लाभ देत आहे. यासोबतच, ग्राहकांना सिलेरिओ हॅचबॅकवर 43,000 रुपयांपर्यंतचा लाभ आणि ईकोवर 24,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. दरम्यान, हे सर्व फायदे डीलरशिप स्तरावर दिले जातात, ज्यामुळे वाहनांची विक्री वाढते.

Web Title: Discount On Maruti Suzuki Cars In February 2023, See Offers On Alto K10 Wagonr Swift Dzire Celerio Eeco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.