कार खरेदीवर करा 60,000 रुपयांपर्यंत बचत; कंपनीकडून फ्रीडम कार्निव्हल ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 04:31 PM2022-08-06T16:31:35+5:302022-08-06T16:32:18+5:30

Offers On Renault Cars: फ्रीडम कार्निव्हल ऑफर 2 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू होईल.

discount on renault cars freedom carnival offer | कार खरेदीवर करा 60,000 रुपयांपर्यंत बचत; कंपनीकडून फ्रीडम कार्निव्हल ऑफर!

कार खरेदीवर करा 60,000 रुपयांपर्यंत बचत; कंपनीकडून फ्रीडम कार्निव्हल ऑफर!

googlenewsNext

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे, या निमित्ताने फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉल्टने आपल्या कारवर फ्रीडम कार्निव्हल ऑफर आणली आहे. कंपनी आपल्या कारवर 60,000 रुपयापर्यंत ऑफर देत आहे. Kwid hatchback, Triber MPV आणि Kiger Compact वर ऑफर उपलब्ध आहेत. रेनॉल्टच्या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, स्क्रॅपपेज बेनिफिट्स आणि एक्सचेंज बोनस याशिवाय 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीजचा समावेश आहे. Renault Triber MPV वर सर्वाधिक डिस्काउंट दिला जात आहे. तर Renault Kiger सर्वात कमी आहे. फ्रीडम कार्निव्हल ऑफर 2 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू होईल.

Renault Triber
महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि गुजरातमध्ये रेनॉल्ट आपल्या Triber MPV वर एकूण 60,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे, ज्यामध्ये 45,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज आणि 10,000 रुपयांचे एक्सचेंज बेनिफिट्सचा समावेश आहे. इतर राज्यातील ग्राहक Renault Triber वर एकूण 55,000 रुपयांचा डिस्काउंट घेऊ शकतात. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये Renault Triber लिमिटेड एडिशनवर एकूण 45,000 रुपयांचा डिस्काउंट आहे तर केरळमध्ये 35,000 रुपयांचा डिस्काउंट आहे. याउलट, उर्वरित भारतात फक्त 15,000 रुपयांचा डिस्काउंट आहे.

Renault Kwid
Renault Kwid हॅचबॅकला दोन पेट्रोल इंजिन ऑप्शन - 0.8-लिटर, तीन-सिलिंडर आणि 1-लिटर, तीन-सिलिंडर मिळतात. लहान इंजिन 53bhp पॉवर जनरेट करते आणि मोठे इंजिन 67bhp पॉवर जनरेट करते. हे RXL, RXL (O), RXT,क्लायंबर आणि क्लायंबर (O) व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. गोवा, महाराष्ट्र आणि केरळमध्ये हॅचबॅकवर एकूण 50,000 रुपयांचा डिस्काउंट आहे, ज्यामध्ये 35,000 रुपये कॅश डिस्काउंट, 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज आणि उर्वरित स्क्रॅपेज पॉलिसी बेनिफ्ट्स यांचा समावेश आहे. तर, रेनॉल्ट इतर राज्यांमध्ये 45,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे.

Renault Kiger
इतर दोन मॉडेल्सच्या विपरीत, Renault Kiger ला राज्यभर 25,000 रुपयांपर्यंत समान डिस्काउंट दिला जात आहे, ज्यामध्ये 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट, 10,000 रुपयांचे स्क्रॅपेज बेनिफिट आणि 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीजचा समावेश आहे. अपडेटेड Compact एसयूव्ही मार्च 2022 मध्ये लाँच करण्यात आली. यात 1-टर्बो-पेट्रोल (99bhp) आणि 1-लीटर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (71bhp) मिळते.

Web Title: discount on renault cars freedom carnival offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.