दिवाळी बंपर: मारुतीची छप्परफाड ऑफर, या गाड्यांवर भरमसाट डिस्काउंट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 08:36 PM2017-09-28T20:36:11+5:302017-09-29T15:09:29+5:30
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 5 हजार रूपयांपासून 50 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट, एक्सचेंज ऑफरशिवाय अनेक प्रकारची सूट मारूतीकडून देण्यात येत आहे. प्रत्येक शहरासाठी ही ऑफर वेगवेगळ्या प्रकारे लागू असणार आहे.
मुंबई - भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने सणासुदीचा काळ लक्षात घेऊन मोठ्या डिस्काउंटची ऑफर आणली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 5 हजार रुपयांपासून 50 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट, एक्सचेंज ऑफरशिवाय अनेक प्रकारची सूट मारुतीकडून देण्यात येत आहे. प्रत्येक शहरासाठी ही ऑफर वेगवेगळ्या प्रकारे लागू असणार आहे.
मारुती सुझुकी ऑल्टो 800 आणि ऑल्टो के 10-
ऑल्टो 800 वर 20 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. याशिवाय हॅचबॅक व्हेरिअंटवर 15 ते 20 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. ऑल्टो के 10 या कारवर ऑल्टो 800 इतकाच एक्सचेंज बोनस मिळत असून 10 हजार रुपयांपर्यंतची सूट देखील मिळत आहे. ऑल्टोच्या एएमटी व्हेरिअंटवर 15 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो.
मारुती सुझुकी वॅगनआर-
मारुती 800 आणि ऑल्टो 800 नंतर मारुतीची सर्वाधिक विक्री असलेली कार म्हणजे वॅगनआर. मारुती वॅगनआर या कारवर तुम्हाला 20 हजार ते 30 हजारापर्यंत कॅश डिस्काउंट मिळू शकतं. मारूती वॅगनआर एएमटी आणि मॅन्युअल व्हेरिअंटवर 20 ते 25 हजारापर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो.
मारुती सुझुकी सिलेरियो-
मारुती सुझुकी सिलेरियोच्या हॅचबॅक व्हेरिअंटवर 30 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळू शकतं. मारुती सुझुकी सिलेरियोवर 15 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनसही मिळत आहे. या कारच्या एएमटी व्हेरिअंटवर 22 हजारापर्यंत डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसची ऑफर मिळू शकते.
मारुती सुझुकी स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायर-
मारुतीच्या या लोकप्रिय कारवर तुम्हाला 20 हजारापर्यंत कॅश डिस्काउंट आणि सोन्याचं नाणं मिळू शकतं. याशिवाय 15 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनसही देण्यात येत आहे. स्विफ्ट डिझायरच्या डिझेल मॉडेलवर 20 हजार रुपयांपासून 22 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट आहे. याशिवाय 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. मारुती Dzire Tour च्या विक्रीवर 20 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे.
मारुती सुझुकी अर्टिगा टी-
या गाडीच्या पेट्रोल मॉडेलवर 5 हजार रुपये कॅश डिस्काउंट आहे. याशिवाय 20 हजारापर्यंत एक्सचेंज बोनस ऑफर मिळू शकते. डिझेल मॉडेलवर 30 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 20 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे.
मारुती सुझुकी सियाझ-
या कारच्या पेट्रोल मॉडेलवर 30 हजारापर्यंत एक्सचेंज बोनस ऑफर मिळू शकते. तर डिझेल मॉडेलवर 40 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 50 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस ऑफर आहे.