Diwali Offer: झीरो डाऊन पेमेंटमध्ये घरी आणा Honda Activa स्कूटर अन् ५,००० रुपये वाचवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 06:27 PM2022-10-21T18:27:07+5:302022-10-21T18:27:51+5:30
दिवाळीच्या काही दिवस आधी होंडा या दिग्गज दुचाकी कंपनीने ग्राहकांसाठी ऑफर जाहीर केली आहे.
दिवाळीच्या काही दिवस आधी होंडा या दिग्गज दुचाकी कंपनीने ग्राहकांसाठी ऑफर जाहीर केली आहे. जपानी कंपनीने देशातील सर्वात आवडती स्कूटर असलेल्या Honda Activa वर खास ऑफर आणली आहे. Honda ने सणासुदीच्या काळात Activa स्कूटरच्या खरेदीवर ५,००० रुपयांपर्यंत ५ टक्के कॅशबॅक ऑफर आणली आहे. पण ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे आणि ग्राहकांना या विशेष ऑफरचा लाभ ३१ ऑक्टोबरपर्यंतच घेता येईल. Honda च्या या नव्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे जाणून घेऊयात.
Honda Activa स्कूटर खरेदी करताना ५,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, यासाठी स्कूटर EMIवर खरेदी करावी लागणार आहे. जेव्हा तुम्ही निवडक बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने EMI व्यवहार करता तेव्हाच तुम्ही Honda च्या विशेष ऑफरचा लाभ घेऊ शकता. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनी स्कूटर खरेदीवर झीरो डाऊन पेमेंट आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देत आहे.
Honda Activa च्या दोन्ही मॉडेल्सवर ऑफर
जपानी टू-व्हीलर ब्रँड भारतात Activa चे दोन मॉडेलची विक्री करतो. ही खास ऑफर कंपनीच्या Activa 6G (110cc) आणि Active 125 (125cc) मॉडेल्सवर उपलब्ध असेल. Activa 6G (110cc) ची एक्स-शोरूम रु.73,086 पासून सुरू होते, तर Activa 125 (125cc) ची देशात एक्स-शोरूम रु.77,062 पासून सुरू होते.
This festive season, enjoy exclusive offers on the purchase of your new Activa. Get 5% cashback upto Rs.5000. For more information, please give us a missed call on +919311340947 or visit https://t.co/AZJkz1d6Qc. #Honda#Activa#ScooterBoleTohActivapic.twitter.com/VnxAyG3Oml
— Honda 2 Wheelers (@honda2wheelerin) October 20, 2022
Activa 6G: स्पेसिफिकेशन आणि फिचर्स
Honda Activa 6G स्कूटर तीन प्रकारांसह बाजारात उपलब्ध आहे. यात 109.51 cc BS6 इंजिनची पावर मिळते. स्कूटर 48 kmpl चा मायलेज देते आणि पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. यात सेपरेट आऊटर फ्युअल फिलर कॅप, इंजिन स्टार्ट-स्टॉप स्विच, सायलेंट स्टार्टर आणि सीट उघडण्यासाठी ड्युअल-फंक्शन स्विच यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
Activa 125cc: स्पेसिफिकेशन आणि फिचर्स
Honda Activa 6G स्कूटरही तीन प्रकारांसह बाजारात उपलब्ध आहे. कंपनीने यामध्ये 124cc BS6 इंजिन वापरले आहे. याला एप्रॉन-माउंट केलेल्या एलईडी पोझिशनसह एलईडी हेडलाइट मिळते. फुल मेटल बॉडी आणि क्रोम हायलाइट्स व्यतिरिक्त, यात मल्टीफंक्शन स्विच, आयडलिंग स्टॉप सिस्टम, पास स्विच, एक्सटर्नल फ्युएल फिलर कॅप आणि फ्रंट ग्लोव्ह बॉक्स सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात. त्याचे मायलेज 46.5 kmpl इतकी आहे.