किती होती पहिल्या Ambassador कारची किंमत? जाणून घ्या ही बंद होताना किती होता कारचा रेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 02:53 PM2022-06-04T14:53:58+5:302022-06-04T14:54:48+5:30

Auto : हिंदुस्तान मोटर्सने Ambassador कार आपल्या उत्तरपारा प्लांटमध्ये तयार केलं होती. हा भारतातील पहिला कार प्लांट होता. तर आशियातील कार बनवणारी दुसरी फॅक्टरी होती. याआधी आशिया कार बनवणारी एकच फॅक्टरी जपानमध्ये होती.

Do you know first ambassador car price was Rs 14000 calculated approx 12 lakh in 2022 | किती होती पहिल्या Ambassador कारची किंमत? जाणून घ्या ही बंद होताना किती होता कारचा रेट!

किती होती पहिल्या Ambassador कारची किंमत? जाणून घ्या ही बंद होताना किती होता कारचा रेट!

googlenewsNext

भारतीय रस्त्यांवर मोठा रूबाबात चालणारी  Hindustan  Motors  ची  Ambassador  कार ने 58 वर्ष भारतीय रस्त्यांवर  राज्य केलं. ही कंपनीने 1957 मध्ये लॉन्च  केली. तर ही बंद 2014 मध्ये करण्यात आली. पण तुम्हाला माहीत आहे का की,  या कंपनीच्या पहिल्या कारची किंमती किती होती आणि बंद होण्याआधी याचा रेट किती होता?

हिंदुस्तान मोटर्सने Ambassador कार आपल्या उत्तरपारा प्लांटमध्ये तयार केलं होती. हा भारतातील पहिला कार प्लांट होता. तर आशियातील कार बनवणारी दुसरी फॅक्टरी होती. याआधी आशिया कार बनवणारी एकच फॅक्टरी जपानमध्ये होती. जी टोयोटा कंपनीची होती. 1957 मध्ये जेव्हा कंपनीने ही कार लॉन्च केली, तेव्हा या कारची किंमत 14 हजार रूपये होती. त्यावेळी ही रक्कम मोठी होती. महागाईचं कॅलकुलेशन केलं तर आज त्या पैशांची व्हॅल्यू साधारण 12 लाख रूपये होते.

Ambassador कारला भारतातील पहिली कार असण्याचा गौरव मिळाला आहे. बिडला ग्रुपचे  BM Birla यांनी 1942 मध्ये हिंदुस्तान मोटर्सची स्थापना केली होती आणि मग 1948 मध्ये कंपनीचा प्लांट बंगालच्या उत्तरपारामध्ये शिफ्ट केला. याच प्लांटमधून 1957 मध्ये पहिल्यांचा Ambassador कार बाहेर आली जिने 58 वर्ष भारताच्या रस्त्यांवर राज्य केलं. भारतात राजकीय नेत्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत ही कार फारच पॉप्युलर झाली होती. इतकंच नाही तर भारत सरकारने तयार होणाऱ्या Ambassador कारपैकी 16 टक्के कार विकत घेतल्या होत्या.

वाढती स्पर्धा आणि मायलेजमुळे हिंदुस्थान मोटर्सची Ambassador कार बाजारात टिकू शकली नाही. 2014 मध्ये कंपनीने याचं प्रॉडक्शन बंद केलं. कधी काळी किंग ऑफ द रोड म्हटली जाणारी ही कार रस्त्यावरून गायब झाली. पण तुम्हाला माहीत आहे का की, कार बंद होताना याची किंमत किती होती? 2014 मध्ये Ambassador कारची किंमत 5.22 लाख रूपये होती.  1957 ते 2014 दरम्यान कंपनीने कारच्या 7 जनरेशन मार्केटमध्ये उतरवल्या.

बदलत्या काळासोबत आता Ambassador ही बदलणार आहे. बातमी अशी आहे की, यावेळी Ambassador इलेक्ट्रिक अवतारात परत येणार आहे. पण याआधी कंपनी इलेक्ट्रिक 2 व्हीलर बनवणं सुरू करणार आहे. हिंदुस्तान मोटर्सचे डिरेक्टर उत्तम बोस म्हणाले की, नवीन Amby  चं डिझाइन, न्यू लूक आणि इंजिनवर काम सुरू आहे. हिंदुस्तान मोटर्सने यूरोपच्या एका ऑटोमोबाइल कंपनीसोबत यासाठी  एक एमओयू साइन केला आहे.

Web Title: Do you know first ambassador car price was Rs 14000 calculated approx 12 lakh in 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.