मारुतीची नवीन एर्टिगा पाहिलीत का ?, जाणून घ्या खास फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 12:26 PM2018-11-03T12:26:44+5:302018-11-03T12:31:34+5:30
तुम्हाला जर नवीन कार घ्यायची इच्छा आहे, तर थोडे थांबा. Maruti Ertigaच्या 2018चे नवे मॉडल 21 नोव्हेंबरला लाँच होणार आहे.
मुंबई- तुम्हाला जर नवीन कार घ्यायची इच्छा आहे, तर थोडे थांबा. Maruti Ertigaच्या 2018चे नवे मॉडल 21 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. मारुतीनं एर्टिगाचं हे मॉडेल अद्ययावत केलं असून, त्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. लूकमध्ये तर ही कार फारच स्टायलिश दिसतेय. या सेकंड जनरेशन एमपीवी कारचं लूक पहिल्याच्या मॉडेलपेक्षा जबरदस्त आहे.
विशेष म्हणजे एर्टिगाच्या इंजिनमध्येही बदल करण्यात आला आहे. जुन्या एर्टिगामध्ये 1.3 लीटर डिझेल इंजिन देण्यात आलं होतं. परंतु नव्या मॉडेलमध्ये 1.5 लीटरचं पेट्रोल इंजिन बसवण्यात आलं आहे. नवी एर्टिगा फारच आकर्षक आणि क्लासिक दिसत आहे. या एर्टिगाच्या पुढच्या भागात मोठं क्रोम ग्रिल, स्लीक हेडलँप आणि नव्या अलॉय व्हिलला पहिल्यापेक्षा चांगलं लूक दिलं आहे. तसेच मागच्या भागात वॉल्व्हो गाड्यांसारखे टेल लँपही देण्यात आले आहेत. या व्हॉल्वो गाड्यांसारख्या टेल लँपमुळे या एर्टिगाला एक वेगळीच चकाकी आली आहे. विशेष म्हणजे एकदम मागच्या बाजूला बसणाऱ्या लोकांना भरपूर स्पेस(जागा) मिळणार आहे.
या एर्टिगाचा बूट स्पेस वाढवला असून, 135 लिटरहून 153 लीटर करण्यात आला आहे. त्यामुळे तुमचं ब-यापैकी सामान डिक्कीत राहू शकणार आहे. तसेच या एर्टिगामधल्या सर्वात शेवटच्या म्हणजे मागच्या भागातील सीट फोल्ड करता येणार आहे. जेव्हा तुम्हाला डिक्कीत जास्त स्पेस हवा असेल, तेव्हा तुम्ही ती सीट फोल्ड करू शकता. या नव्या एर्टिगामधअये ऑडी गाड्यांसारखं डॅशबोर्ड देण्यात आलं आहे. या डॅशबोर्डमुळे गाडी एकदम रॉयल वाटते. मारुतीनं या नव्या मॉडेलमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलचं नवं फीचर दिलं आहे.
या गाडीमध्ये स्मार्ट प्ले टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, अँड्राइड ऑटो अन् अॅपल कार प्लेसारख्या फीचर्सचा समावेश आहे. पुढच्या दोन सीटसाठी दोन एअरबॅग्स देण्यात आल्या असून, ABS आणि EBD सारख्या तंत्रज्ञानानं युक्त आहेत.
अद्ययावत मॉडेलमध्ये 105 पीएस पॉवर दमदार इंजिन असून, ते 138 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करेल. तर 1.2 लीटर डिझेल इंजिनला 90 पीएस पॉवर देण्यात आली असून, ते 200 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करेल.
एर्टिगाच्या गिअरबॉक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. मारुती एर्टिगा 2018 ही Honda BR-Vला टक्कर देणार आहे.
परंतु नव्या एर्टिगाची किंमत जुन्या एर्टिगापेक्षा जास्त असेल. या नव्या एर्टिगाची किंमत 7 लाखांपासून सुरू होणार असून, ती 11 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.