दरवाजाला वंगण हवेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:20 PM2017-08-02T16:20:06+5:302017-08-02T16:20:17+5:30

कारच्या सर्व दरवाजांची सहज सुलभपणे हालचाल होणे गरजेचे असते. पण त्यासाठी त्यांचे वंगण नित्यनेमाने पाहाणे आवश्यक आहे.

 The door has a greasy loincloth | दरवाजाला वंगण हवेच

दरवाजाला वंगण हवेच

Next

दरवाजा नीट लागत नाही, नीट उघडतही नाही, उघडझाप करताना कुई कुई आवाज येतो...अनेकांना दरवाज्याला येणारा आवाजही जाणवत नाही. पण यामागे नेमके कारण काय,याचा शोधही घेण्याची तसदी घेतली जात नाही. कारण अगदी साधे सोपे असते. त्याला खर्चही फार नसतो की त्यासाठी सर्व्हिस सेंटरकडेही धाव घेण्याची गरज नसते. परंतु आजकाल अनेकांना फुरसत नसल्याचे कारण पुढे केले जाते आणि आपल्याला वेळ काढता येत नसल्याचेही छानपैकी दडपले जाते. यातून फायदा होतो तो साहजिकच सर्व्हिस सेंटरचा वा गॅरेजवाल्यांचा. वैयक्तिक वापराची कार घेतली की फक्त भटकायला किंवा ये—जा करायला आपण वेळ देतो पण त्या गाडीसाठीही काही बाबतीत वेळ द्यायला हवा. मोठ्या उद्योगपतींचे समजू शकतो किंवा बड्या पगारदारांची शानही कळू शकते पण सर्वचजण कार मालक असले तरी या बड्या कॅटेगरीतील असतात असे नाही. यासाठी ते वेळ काढू शकतात.थोड्या आवश्यक बाबी वा साधन सामग्री कारमध्ये ठेवूही शकतात. त्यातलीच ही दरवाजाच्या त्रासाची गोष्ट. पांढऱ्या रंगाचे ग्रीस विकत मिळते त्याचा वापर कारच्या दरवाज्यांच्या बिजागिरासाठी करा. अगदी साधा व सोपा मार्ग आहे.

प्रथम दरवाजा उगडून फडक्याने त्या बिजागिराला साफ करा. त्यात आधी असलेल्या ग्रीस वा अन्य धुळीमुळे त्या ठिकाणी आलेला गंजासारखा भाग असले तर तोही साफ करा व त्यासाठी वाटल्यास खराब टुथब्रशचाही वापर करा. त्यानंतर सुक्या फडक्याने ते पुसून तेथे बोटाने पांढरे ग्रीस भरून घ्या. त्या ऐवजी जळके इंजिन ऑइलही वापरू शकता पण त्याचे कपड्याला डाग लागण्याची भीती असल्याने त्याबाबत तुम्हीच निर्णय घ्या. सर्व दरवाजे,त्याचे लॉक्स या ठिकाणी पांढऱ्या ग्रीसचा वापर करता येईल. त्यानंतर दरवाजा उघडझाप करून तो वापरात ठेवा.

खरे म्हणजे दरवाजे असे आवाज करू नयेत यासाठी त्याची निगा म्हणजे त्यांना वंगण करण्याची आवश्यकता असते. वापरलेले इंजिन ऑइल हा सर्वात स्वस्त व मोफत मिळणारा वंगणाचा प्रकार. त्यामुळे दरवाजे अधिक जलदगतीने चांगले काम करू शकतात. हे वापरलेले इंजिन ऑइल तुमच्या नेहमीच्या सर्व्हिस सेंटरला वा गॅरेजवाल्याकडे मिळू शकते. मात्र त्यात धूळ साठण्याच्या दरम्यान नित्यनेमाने दरवाजे तपासून ते साफ करावे लागतात. तेल गळून कारमध्ये बसणाऱ्या महिलांच्या साड्या वा लांब ड्रेस यांना ते तेल अनवधानाने लागू शकते.पण ग्रीसचे तसे होत नाही ते क्रीमसारखे असल्याने ओघळणार नाही. अर्थात वंगण हे त्या दरवाजांना असले पाहिजेच. मग दरवाजा पुढचा असो की मागचा वा डिक्कीचा असो की बॉनेटचा. त्याची क्रिया ही सहजपणे झाली पाहिजे हे गरजेचे.

Web Title:  The door has a greasy loincloth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.