कारच्या खिडकीतून येणाऱ्या पावसापासून बचाव करणारी डोअर वायझर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 10:38 AM2017-08-31T10:38:06+5:302017-08-31T10:39:24+5:30
कारच्या खिडकीतून वरच्या बाजूने ओघळणारे पावसाचे पाणी आतमध्ये येऊ नयेत, पावसाचे पाणी थेट आत येऊ नये, वाऱ्याचा आवाज उघड्या खिडकीतून होऊ नये यासाठी रेन विंड वायझर हे एक उपयुक्त साधन आहे.
एसयूव्ही, सेदान, हॅचबॅक अशा विविध प्रकारातील कारसाठी बाजारात अनेक पद्धतीची अतिरिक्त अशी साधनसामग्री मिळत असेत. कार उत्पादक कंपनीकडून साऱ्याच वस्तू काही दिल्या जात नाहीत, काही वस्तू अशा असतात की त्या घेणे कार वापरणाऱ्यांना खूपच उपयोगी पडत असतात. अशाचपैकी एक साधन म्हणजे विंड डोअर वायझर. कारच्या दोन्ही बाजूला असलेल्या खिडक्यांवर बाहेरच्या बाजूने खिडकीच्या वरच्या बाजूने एक शेड बसवण्यात येते. त्यामुळे पावसामध्ये काहीशी खिडकी उघडी ठेवली तरी पाणी आतमध्ये प्रवाशाच्या वा चालकाच्या अंगावर येत नाही, वरून पाणी ओघळून आतील बाजूला येत नाही. तसेच कार पावसाच्या व्यतिरिक्तच्या हंगामात वापरताना खिडक्या उघड्या ठेवलेल्या असल्यास, त्यावेळी आतमध्ये येणाऱ्या वाऱ्याचे प्रमाणही कमी होते, वाऱ्याच्यामुळे येणारा एक आवाजही रोखला जातो. या साधनाला काही कार उत्पादक कंपन्या मुळातच लावून देत असतात. थोडक्यात त्या कंपनीमेकमध्येच तुम्हाला हे लाभ देणारे असते. पण ते नसले तरी तुम्हाला बाजारामधून तुमच्या कारच्या रंगाला सूट होऊ शकेल अशा रंगांमध्ये किंवा गॉगलसारख्या रंगामध्येही हा विंड डोअर वायझर मिळू शकतो.
विंड डोअर वायझर लावण्यासाठी दोन्ही बाजूंनी चिकटणारी टेप त्याला आतील बाजूने लावलेली असते. त्याच्या बाहेरच्या बाजूची ही चिकटणारी बाजू असते त्यावरील प्लॅस्टिकचे आवरण काढून तुम्ही हा वायझर खिडकीच्या वरच्या बाजूला चिकटवायचा असतो. विविध कंपन्यांच्या कारनुसार हे वायझर उपलब्ध असतात. प्रत्येक कंपनीच्या कारचे भिन्न प्रकार व त्या त्या कारच्या खिडक्यांचे वेगवेगळे आकार लक्षात घेऊन विंड डोअर वायझर किंवा रेन वायझर बाजारात उपलब्ध असताता. पावसामध्ये काहीवेळा काच थोडी खाली केली जाते त्यावेळी हवाही येते व पाणीही पावसाचे आतमध्ये येत नाही. त्याचप्रमाणे पावसामध्ये छतावरून येणारे ओघळ थेट आतमध्ये येत नाहीत. अर्थात काच आम्ही पावसामध्ये उघडत नाही, ए. सी. चालू असतो, आम्हाला त्याची आवश्यकता नाही, असे म्हणणाराही ग्राहक अहे. त्यामुळे अशा प्रकारच्या साधनांची आवश्यकता किती आहे, हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते.