ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं? टेन्शन घेऊ नका, घर बसल्या चुटकीसरशी परत मिळवा! जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 02:15 PM2022-12-08T14:15:48+5:302022-12-08T14:16:59+5:30

Duplicate Driving License: ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र ही सर्व अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी पत्त्याच्या पुराव्यासाठी आणि ओळखपत्रासाठी वापरली जातात.

driving license application check how to apply for duplicate dl on sarathi parivahan | ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं? टेन्शन घेऊ नका, घर बसल्या चुटकीसरशी परत मिळवा! जाणून घ्या...

ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं? टेन्शन घेऊ नका, घर बसल्या चुटकीसरशी परत मिळवा! जाणून घ्या...

googlenewsNext

Duplicate Driving License: ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र ही सर्व अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी पत्त्याच्या पुराव्यासाठी आणि ओळखपत्रासाठी वापरली जातात. जर तुम्ही स्कूटर, बाईक किंवा कार चालवत असाल, तर कोणतेही वाहन चालवण्‍यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणं किती गरजेचं आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्‍ही ड्रायव्हिंग करत असाल आणि तुमच्‍याकडे ​​ड्रायव्हिंग लायसन्स नसेल, तर कारवाईला सामोरं जावं लागतं. पण ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं असेल तर काय करावं? नव्यानं सगळी प्रक्रिया करण्याच्या विचारानं काळजीत पडला असाल तर टेन्शन घेऊन नका. आता तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं तरी घरबसल्या परत मिळवू शकता. कसं ते जाणून घेऊयात...

ड्युप्लिकेट लायसन्ससाठी कधी अर्ज करता येतो?
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ड्युप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कधी अर्ज करता येतो यासाठीचे काही नियम आहेत. 

  • तुमचं DL हरवलं किंवा नष्ट झालं असल्यास.
  • ड्रायव्हिंग लायसन्स फाटलं/तुटलं किंवा DL वरील तपशील पुसला गेल्यास.
  • DL वरील तुमचा फोटो बदलण्याची गरज भासल्यास.


अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम, तुम्हाला https://parivahan.gov.in/parivahan या वेबसाइटवर जावं लागेल आणि नंतर ऑनलाइन सर्व्हीस सेक्शनवर क्लिक करा
  • ऑनलाइन सर्व्हीस सेक्शनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवेच्या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे राज्य निवडा आणि proceed वर क्लिक करा.
  • यानंतर, अप्लाय फॉर ड्युप्लिकेट डीएलवर क्लिक केल्यानंतर, सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि कंटीन्यू बटणवर क्लिक करा.
  • यानंतर, तुमचा DL क्रमांक, जन्मतारीख, कॅप्चा कोड टाकल्यानंतर Get DL वर क्लिक करा.
  • परवाना तपशील पडताळल्यानंतर, मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक नमूद करा.
  • यानंतर तुम्हाला सेवांची यादी दिसेल, त्यापैकी 'इश्यू ऑफ डुप्लिकेट डीएल' निवडा आणि proceed वर क्लिक करा.
  • पुढे एक नवीन पेज उघडेल, येथे ड्युप्लिकेट लायसन्ससाठी अर्ज का करत आहात याचं कारण नमूद करावं लागेल. 
  • कारण सांगितल्यानंतर तुम्हाला कन्फर्म बटणावर क्लिक करावे लागेल.
  • स्क्रीनवर दाखवलेला कोड एंटर करा आणि सबमिट बटण दाबा. सबमिट बटण दाबल्यानंतर, तुम्हाला पोचपावती स्लिप मिळेल, जी तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा त्याची प्रिंट काढू शकता आणि ती तुमच्याकडे ठेवू शकता.
  • तुम्ही ड्युप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन पेमेंट करताच, तुमचा अर्ज आरटीओकडे पाठवला जाईल.


अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत
तुम्हाला फॉर्म २ अर्ज, मूळ DL (उपलब्ध असल्यास), हरवल्यास ड्रायव्हिंग लायसन्सची अटेस्टेड कॉपी सबमिट करावी लागेल आणि शुल्क भरावं लागेल.

Web Title: driving license application check how to apply for duplicate dl on sarathi parivahan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन