Driving License Rule Change: लायसन काढण्यासाठी आता RTO चाचणीची गरज नाही; केंद्र सरकारने नियम बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:05 PM2022-02-28T14:05:42+5:302022-02-28T14:05:57+5:30
Driving License RTO Rule Change: केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन बनविण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. ही प्रक्रिया सोपी केली आहे.
वाहतुकीचे नियम आता मोठ्या प्रमाणावर बदलले आहेत. दंडही बदलला आहे. लायसन नसतानाही लोक गाडी चालवत असतात. अनेकदा लोकांना लायसन काढतानाचे किचकट नियम, प्रक्रिया आदींमुळे लायसन काढता येत नाही. पत्त्याचे पुरावे नसतात तर काही वेळा लायसन काढतानाची चाचणी. आता यापुढे लायसन काढण्यासाठी आरटीओत जाऊन चाचणी द्यायची गरज राहणार नाही. चाचणी न देताच तुम्हाला लायसन मिळणार आहे.
केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन बनविण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. ही प्रक्रिया सोपी केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत. यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये अडकून राहण्याची गरज नाही.
मात्र, यासाठी एक काम करावे लागणार आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमधील चाचणीची वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी स्वतःची नोंदणी करू शकता. त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल, अर्जदारांना त्या स्कूलकडून प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केला जाईल.
यासाठी मंत्रालयाने ड्रायव्हिंग स्कूलना काही अटी घातल्या आहेत. त्यात बसणारीच स्कूल तुम्हाला आरटीओमध्ये न जाता देखील प्रमाणपत्र देणार आहेत.