ड्रायव्हिंग टेस्ट न देता फक्त 7 दिवसात मिळेल लायसन्स, जाणून घ्या कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:39 PM2022-11-24T14:39:02+5:302022-11-24T14:40:02+5:30

driving license : तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. 

driving license within seven days without giving test know how to apply | ड्रायव्हिंग टेस्ट न देता फक्त 7 दिवसात मिळेल लायसन्स, जाणून घ्या कसे?

ड्रायव्हिंग टेस्ट न देता फक्त 7 दिवसात मिळेल लायसन्स, जाणून घ्या कसे?

Next

जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मिळवण्याचा विचार करत असाल, परंतु यासाठी तुम्ही टेस्ट पास होऊ शकत नाही, तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा पद्धतीबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कोणतीही टेस्ट देण्याची गरज नाही. यासह तुम्हाला फक्त सात दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल. येथे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. 

दर महिन्याला हजारो लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. पण ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे अनेकांना लायसन्स मिळत नाही. दरम्यान, ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, 16 ते 18 वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला वाहन चालविण्याचे लायसन्स मिळू शकते. पण त्याला फक्त लर्निंग लायसन्स मिळेल. हे लायसन्स मिळाल्यानंतर ती व्यक्ती केवळ गीअरशिवाय गाडी चालवू शकणार आहे. जर तुम्हाला गीअर असलेले वाहन चालवायचे असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवावे लागेल. 

हे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही यासाठी काही मिनिटांत तुमच्या घरच्या आरामात ऑनलाइन अर्ज करू शकता. एकदा तुम्ही टेस्ट उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळू शकते. परंतु लायसन्स मिळवण्यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तुमच्या घराचा पत्ता आणि वयाचा पुरावा दिल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळेल. तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असू शकत नाही. यानंतर, कलम 4 अंतर्गत त्या व्यक्तीला लर्निंग लायसन्स ठेवण्याची परवानगी दिली जाते.

या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील...
- ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do. या लिंकवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करण्याचा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करावे लागेल.
- तुम्हाला सर्व कागदपत्रे द्यावी लागतील, त्यानंतर आरटीओ त्यांची पडताळणी करेल.
- कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, तुम्हाला सात दिवसांच्या आत ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.
- दरम्यान, टेस्ट न देता तुम्ही फक्त शिकाऊ वाहन चालविण्याचे लायसन्स मिळवू शकता.

Web Title: driving license within seven days without giving test know how to apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.