Traffic Rule: शॉर्ट कट महागात पडेल! राँग साईडने गाडी चालवली तर ५००० चा दंड; तुरुंगवारीही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 11:55 AM2021-09-24T11:55:46+5:302021-09-24T11:56:20+5:30

Traffic Rule, Wrong side Driving: दिल्लीमध्ये हे काय़दे लागू झाले आहेत. तेथील पोलिसांनी वाहतूक कोंडी जिथे जास्त होते, अपघाताची ठिकाणे हेरून तिथे हा नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

Driving on wrong side could now land you in jail; 5000 rs fine, DL seized | Traffic Rule: शॉर्ट कट महागात पडेल! राँग साईडने गाडी चालवली तर ५००० चा दंड; तुरुंगवारीही

Traffic Rule: शॉर्ट कट महागात पडेल! राँग साईडने गाडी चालवली तर ५००० चा दंड; तुरुंगवारीही

googlenewsNext

सिग्नल, चौकात किंवा दुभाजकामुळे लांबचा फेरा चुकविण्यासाठी बऱ्याचदा चुकीच्या बाजुने वाहन चालविले जाते. यामुळे मोठमोठे अपघात होतात. खासकरून दुचाकी, रिक्षा, कार असे प्रकार सर्रास करतात. यामुळे हे प्रकार थांबविण्यासाठी केंदीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दोन वर्षांपूर्वी नवीन कायदे आणले होते. यानुसार विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास 5000 रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. (fine of Rs 5,000 for driving on the wrong side.)

दिल्लीमध्ये हे काय़दे लागू झाले आहेत. तेथील पोलिसांनी वाहतूक कोंडी जिथे जास्त होते, अपघाताची ठिकाणे हेरून तिथे हा नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार एखाद्याने व्हिडीओ काढूनदेखील पाठविला तरी देखील कारवाई करण्यात येणार आहे. 

सर्वाधिक प्रमाणात या नियमाचे उल्लंघन केले जाते. कारण हा शॉर्टकट असतो. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अडचण होते आणि अपघातही होतात. नवीन मोटर व्हेईकल अॅक्ट 184 नुसार हे कृत्य गंभीर ड्रायव्हिंग कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आला आहे. हा नियम तोडल्यास 5000 रुपयांपर्यंतचा दंड आणि त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन जप्त करण्यात येणार आहे. तसेच तुरुंगवारीही घडण्याची शक्यता आहे. 

सोशल मीडियावरही पुरावे देऊ शकता
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिक सोशल मीडियावरूनही याची तक्रार करू शकतात. फोटो, व्हिडीओ दिल्यास त्या वाहनचालकावर कारवाई केली जाणार आहे. अपघाताचा धोका असूनही लोक चुकीच्या दिशेने वाहने चालवितात. यामुळे हे अपघात रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केली.

Web Title: Driving on wrong side could now land you in jail; 5000 rs fine, DL seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.