लाँच झाली 803CC ची जबरदस्त Motorcycle, पाहा किंमत आणि फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 08:59 PM2022-06-28T20:59:07+5:302022-06-28T20:59:59+5:30
कंपनीनं लाँच केली जबरदस्त बाईक, पाहा कोणती आहे ही बाईक आणि काय आहे खास?
डुकाटी इंडियानं अर्बन मोटार्ड ट्रिममध्ये नवं स्क्रॅम्बलर मॉडेल लाँच केलं आहे. स्क्रॅम्बलर ब्लडलाइनच्या अन्य मॉडल्सच्या तुलनेत डुकाटीनं अर्बन मोटर्ड ट्रिममध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. यामध्ये थोडा उंच फ्रंट फेंडर आणि सिंगल साईड माऊंटेड नंबर प्लेट देण्यात आली आहे.
या बाईकची किंमत 11.49 लाख रूपये आहे आणि किंमतीच्या बाबतीत 1100 डार्क प्रो आणि डेझर्ट स्लेजच्या दरम्यानचं हे मॉडेल आहे. नव्या इटालियन स्क्रॅम्बलर अर्बन मोटार्डमध्ये 803cc, L ट्वीन इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 73bhp आणि 66.2Nm चं टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 6 स्पीड गिअरबॉक्सही देण्यात आलाय.
LED लाईट्स व्यतिरिक्त, Ducati Scrambler Urban Motored ला LCD युनिट देखील मिळते, ज्यामध्ये रन-ऑफ-द-मिल डेटा असतो. याशिवाय, तुम्हाला एक लहान अंडरसीट स्टोरेज कंपार्टमेंट, यूएसबी सॉकेट आणि ड्युअल-चॅनेल एबीएस देखील मिळतात. बाईकच्या ब्रेकिंग हार्डवेअरमध्ये 330mm चं फ्रन्ड डिस्क आणि 245mm चं रिअर डिस्क मिळतो. डुकाटी स्क्रॅम्बलर अर्बन मोटार्डची ऑफिशिअल बुकिंगदेखील सुरू करण्यात आली आहे.