सणांच्या काळात दुचाकींच्या विक्रीला आली उधाणाची भरती!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 02:33 PM2017-10-11T14:33:35+5:302017-10-11T14:37:28+5:30

नवरात्रीपासून सुरू झालेल्या सणांच्या मोसमामध्ये भारतीय ग्राहकांनी दुचाकींची अगदी भरभरून खरेदी केली आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल १०.३ लाख दुचाकींची खरेदी भारतभरातील ग्राहकांनी केली असून आजा दुचाकी कंपन्यांचे लक्ष सणासुदीच्या दुसऱ्या टप्प्याकडे म्हणजे दिवाळीकडे आहे.

During the festive season the sale of bikes increased | सणांच्या काळात दुचाकींच्या विक्रीला आली उधाणाची भरती!

सणांच्या काळात दुचाकींच्या विक्रीला आली उधाणाची भरती!

Next
ठळक मुद्देनवरात्रीच्या पहिल्याच दिवशी २०१६ मध्ये २४ हजार इतकी विक्री झाली होतीमात्र यंदा २०१७च्या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी हा आकडा दुप्पट झाला, तब्बल ५० हजार मोटारसायकली विकल्या गेल्यासप्टेंबर २०१७ मध्ये १०.३ लाख दुचाकींची विक्री झाल्याचे सिआमने नमूद केले आहे

जीएसटीनंतर दुचाकी वाहनांच्या विक्रीसाठी पहिल्यांदाच आलेल्या यावर्षीच्या सणांच्या मोसमामध्ये नवरात्री पासून दसऱ्यापर्यंतच्या कालावधीमध्ये स्कूटर व मोटोरसायकल कंपन्यांनी अनेकविध सवलती, इएमआय योजना आणल्या. अगदी दिवाळीपर्यंत न नंतरही डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या काळातही साधारणपणे या सणांच्या निमित्ताने दुचाकी खरेदीचा मोसम असतो. जीएसटीनंतर काहीशा स्वस्त झालेल्या दुचाकींना भारतातील ग्राहकांनी अगदी भरभरून पाठिंबाच दिला असल्याचे जाणवते.

सध्या सणासुदींचा मोसम या भरभरून झालेल्या दुचाकींच्या खरेदीमुळे नोटबंदीच्यानंतर वर्षभरातच आला व दुचाकी कंपन्यांनाही प्रोत्साहीत करून गेला आहे. होंडा मोटारसायकल अॅण्ड स्कूट इंडिया लि.च्या दुचाकींची तब्बल ५० हजार दुचाकींची विक्री सणांच्या कालावधीच्या पहिल्या टप्प्यातच झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी २०१६ मध्ये २४ हजार इतकी विक्री झाली होती. मात्र यंदा २०१७च्या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी हा आकडा दुप्पट झाला, तब्बल ५० हजार मोटारसायकली विकल्या गेल्या. केवळ त्यांच्याच कंपनीच्या नाहीत तर हीरो मोटो कॉर्पचीही विक्री झकास झाली. एकंदर दुचाकीची बाजारपेठ फुलून गेली असे म्हणायला हरकत नाही. वाहन उद्योगांच्या सिआम या संघटनेने सप्टेंबर म्हणजेच या सणांच्या कालावधीच्या पिहल्या महिन्यांचे आकडे जाहीर केले आहेत. त्यामध्ये सप्टेंबर २०१७ मध्ये १०.३ लाख दुचाकींची विक्री झाल्याचे नमूद केले आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत टक्क सात टक्के जास्त विक्री सप्टेंबर २०१७मध्ये झाली आहे.

अजून दिवाळी बाकी आहे, काही दिवसच दिवाळीला शिल्लक असून दुकानांमध्ये अजूनही ग्राहकांची रेलचेल चांगलीच आहे. त्यामध्ये विक्री चांगलीच होईल असा विश्वास हीरो मोटो कॉर्पच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. सणासुदींच्या निमित्ताने ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींच्या भेटी, इएमआयमधील फायदे या बरोबरच अन्य सुविधा यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात ग्राहक वाढले. बजाजनेही आपल्या सर्व मोटारसायकलींवर विविध प्रकारच्या सवलती देताना शून्य व्याजाच्या इएमआयची भेट देऊ केली होती.दिवाळीपूर्वी लोकांच्या हातात यामुळे दुचाकी पडतील, अशी अपेक्षाही अाहे. आता सप्टेंबरनंतरच्या या दिवाळीपूर्वी झालेल्या खरेदीमध्ये किती वाढ होते ते पाहाण्यासारखे आहे.

Web Title: During the festive season the sale of bikes increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.