10 रुपयात पुणे-मुंबई प्रवास; आनंद महिंद्रांनी शेअर केला अनोख्या EV बाइकचा Video...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 05:18 PM2022-12-02T17:18:55+5:302022-12-02T17:35:28+5:30

या बाइकवर 6 जणांना बसण्याची सोय असून, फक्त 10 रुपयांमध्ये बाइक फूल चार्ज होते.

Electric Bike: anand mahindra shared video of electric bike for 6 people in rs10000 | 10 रुपयात पुणे-मुंबई प्रवास; आनंद महिंद्रांनी शेअर केला अनोख्या EV बाइकचा Video...

10 रुपयात पुणे-मुंबई प्रवास; आनंद महिंद्रांनी शेअर केला अनोख्या EV बाइकचा Video...

Next


Electric Bike: उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मजेशीर, प्रेरणादायी आणि तंत्रज्ञानाशी संबंदित व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असतात. फॉलॉअर्स आनंद महिंद्रांच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. आता त्यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

इलेक्ट्रिक बाइकचा व्डिओ शेअर
हा व्हिडिओ एका इलेक्ट्रिक बाइकशी संबंधित आहे, ज्यावर चक्क 6 लोक बसून प्रवास करू शकतात. एका तरुणाने घरातील सामान्य वस्तू वापरून एक अशी इलेक्ट्रिक बाइक तयार केली आहे, ज्यावर एक-दोन नव्हे तर 6 जण बसून जाऊ शकतात. त्याने या बाइकच्या मागे बसण्यासाठी सह सीटही दिले आहेत. या इलेक्ट्रिक बाइकबद्दल तरुणाचा दावा आहे की, एका चार्जवर याची रेंज 150Km पर्यंत आहे. 

इलेक्ट्रिक बाइकची वैशिष्ट्ये
लोखंडी पाईपच्या मदतीने ही बाईक तयार करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 8 ते 10 फूट लांबीच्या पाईपच्या साहाय्याने इलेक्ट्रिक बाइकची फ्रेम तयार करण्यात आली आहे. फ्रेमच्या तळाशी, पाय ठेवण्यासाठी स्टॅड बनवला आहे. प्रवाशांच्या सीटला एक हँडल जोडलेले आहे. बाइकसमोर एलईडी लाईट आणि हॉर्न आहे. व्हिडिओच्या शेवटी या इलेक्ट्रिक बाइकवर 6 लोक बसलेले दिसत आहेत.

बाइकची किंमत?
बाइक तयार करणाऱ्या तरुणाने सांगितले की, सूमारे 10 ते 12 हजार रुपयांमध्ये त्यानी ही बाइक तया रकेली आहे. बाइकला पूर्ण चार्ज करण्यासाठी फक्त 8 ते 10 रुपये खर्च येतो. म्हणजेच 10 रुपये खर्चून 6 जणांना 150 किमीपर्यंतचा प्रवास करता येतो. याचा अर्थ एक व्यक्ती केवळ 1.66 रुपये खर्च करून 150 किलोमीटरचा प्रवास करू शकेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, एक व्यक्ती केवळ 1.66 रुपये खर्च करून मुंबईवरुन पुण्याला जाऊ शकतो. 

Web Title: Electric Bike: anand mahindra shared video of electric bike for 6 people in rs10000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.