Electric Bike: 1.5 लाखात Electric Bullet, फुल चार्जमध्ये देईल 150KM ची रेंज; फक्त 2000 रुपयांत होईल बुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 05:58 PM2022-12-20T17:58:44+5:302022-12-20T18:00:53+5:30

काही इलेक्ट्रिक बाइक्सदेखील बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, असे असले तरी ग्राहकांना स्प्लेंडर आणि रॉयल एनफिल्ड बुलेट सारख्या इलेक्ट्रिक बाईक्सची प्रतिक्षा आहे. 

Electric Bike royal enfield bullet electric version with 150 km range in full charge only in 1.5 lakh | Electric Bike: 1.5 लाखात Electric Bullet, फुल चार्जमध्ये देईल 150KM ची रेंज; फक्त 2000 रुपयांत होईल बुक!

Electric Bike: 1.5 लाखात Electric Bullet, फुल चार्जमध्ये देईल 150KM ची रेंज; फक्त 2000 रुपयांत होईल बुक!

googlenewsNext

देशात इलेक्ट्रिक बाइक्सची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. ओलापासून ते ओकिनावापर्यंत इलेक्ट्रिक स्कूटर्सची जबरदस्त विक्री होताना दिसत आहे. याशिवाय काही इलेक्ट्रिक बाइक्सदेखील बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, असे असले तरी ग्राहकांना स्प्लेंडर आणि रॉयल एनफिल्ड बुलेट सारख्या इलेक्ट्रिक बाईक्सची प्रतिक्षा आहे. 

यातच, बिहारची एक कंपनी या पॉप्युलर बाईक्सचे इलेक्ट्रिक व्हर्जन तयार करून आपल्या वेबसाइट्सवर विकत आहे. या वेबसाईटवर इलेक्ट्रिक बाइक्स आणइ स्कुटर्सचे बरेच ऑप्शन्स उपलब्ध आहेत. आपण येथे रॉयल एनफील्ड बुलेटदेखील (Royal Enfield Bullet) इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये  खरेदी करू शकता. 

Electric Royal Enfield Bullet -
Silveline नावाची ही कंपनी अगदी रॉयल एनफील्ड बुलेट सारखीच दिसणारी इलेक्ट्रिक बाईक विकत आहे. या बाईकला Love Plus असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही बाईक केवळ 2000 रुपयांत केली जाऊ शकते. स्पेसिफिकेशन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, या बाईकला 72V/48AH ची बॅटरी देण्यात आली आहे. या बाईकची टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास एवढी आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही बाईक फुल चार्ज केल्यास 150KM पर्यंत चालू शकते. हिची किंमत 1,51,999 रुपये एवढी आहे.

मोठी आहे इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची लिस्ट -
केवळ बुलेटच नाही, तर येथे पॅशन प्रो आणि Yamaha R15 देखील इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये विकली जात आहे. याशिवाय इलेक्ट्रिक ऑटो आणइ ई-रिक्शादेखील येथे उपलब्ध आहेत. कंपनीचे सर्वात स्वस्त मॉडेल 56 हजार रुपयांचे आहे. ही एक स्लो स्पीड मोपेड आहे. जी फुल चार्ज केल्यानंतर 70 Km पर्यंत चालते. ही फुल चार्ज होण्यासाठी 2 ते 3 तास लागतात.
 

Web Title: Electric Bike royal enfield bullet electric version with 150 km range in full charge only in 1.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.