Electric Car : या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची छप्परफाड विक्री; किंमत सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 05:35 PM2022-09-13T17:35:21+5:302022-09-13T17:37:03+5:30

Best Selling Electric Car Brands: देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. Tata Motors, MG आणि Hyundai शिवाय, महिंद्रा आणि BYD सारख्या कंपन्याही आता या स्पर्धेत उतरल्या आहेत.

Electric Car tata motors to mg here is best selling electric car in august 2022 | Electric Car : या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची छप्परफाड विक्री; किंमत सर्वात कमी

Electric Car : या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची छप्परफाड विक्री; किंमत सर्वात कमी

googlenewsNext

देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. Tata Motors, MG आणि Hyundai शिवाय, महिंद्रा आणि BYD सारख्या कंपन्याही आता या स्पर्धेत उतरल्या आहेत. महिंद्राने नुकतीच आपली पहिली इलेक्ट्रिक SUV XUV400 सादर केली आहे, ही गाडी जानेवारी 2023 पासून विकण्यास सुरूवात होण्याची शक्यता आहे. यातच एक कंपनी अशी आहे, जिने इलेक्ट्रिक कार विक्रीच्या बाबतीत इतर सर्व कंपन्यांना मागे टाकले आहे. तर, जाणून घेऊयात ऑगस्त 2022 मध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक कार विकणाऱ्या 5 कंपन्यांसंदर्भात.

छप्पर फाड विकल्या गेल्या या कंपनीच्या इलेक्ट्रिक कार - 
ऑगस्ट 2022 मध्ये, टाटा मोटर्स पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रिक कार निर्माता बनली आहे. या कंपनीने गेल्या महिन्यात एकूण 2,747 युनिट्सची विक्री केली. टाटा मोटर्स भारतात Nexon EV Prime, Nexon EV Max, Tigor EV सारख्या मॉडेल्सची विक्री करते. यांपैकी नेक्सॉन ईव्ही ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. ऑगस्ट 2021 मध्ये कंपनीने केवळ 575 युनिट्सचीच विक्री केली होती. याचा विचार करता, आता टाटा मोटर्सने तब्बल 377.74% वार्षिक वृद्धी नोंदवली आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीची टाटा टिगोर ईव्ही ही देशातील सर्वात स्वस्त पॅसेंजर इलेक्ट्रिक कार आहे.
 
टॉप 5 कंपन्या अशा -
लिस्टमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर MG ZS EV आणि Hyundai Kona यांचा क्रमांक लागतो. यांचे अनुक्रमे 311 यूनिट्स आणि 69 यूनिट्स विकले केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत MG ZS EV ची विक्री 17 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर ह्युंदाई कोनाची विक्री 475 टक्क्यांनी वाढली आहे. याप्रमाणे, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर BYD E6 आणि BMW iX/ BMW i4 आहेत. यांचे अनुक्रमे 44 यूनिट्स आणि 25 यूनिट्स विकले गेले आहेत.

Web Title: Electric Car tata motors to mg here is best selling electric car in august 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.