Electric Car : ही असेल देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV, टाटा नेक्सॉन EV ची करेल सुट्टी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 04:58 PM2023-04-08T16:58:00+5:302023-04-08T16:59:16+5:30
खरे तर, कंपनीचा फोकस आपल्या ईव्ही वाहनांचा आणखी विस्तार करण्यावर आहे. लवकरच कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार येत आहे.
भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात टाटा मोटर्सने (Tata Motors) स्वतःला प्रस्थापित केले आहे. सध्या ही देशातील पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रिक कार विकणारी कंपनी आहे. हा टप्पा गाठण्यात कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही Tata Nexon EV च्या यशाचा मोठा वाटा आहे. टाटा आपली Tiago आणि Tigor चीही इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये विक्री करते. खरे तर, कंपनीचा फोकस आपल्या ईव्ही वाहनांचा आणखी विस्तार करण्यावर आहे. लवकरच कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार येत आहे.
टाटा मोटर्सने (Tata Motors) 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये आपल्या Harrier SUV चे EV व्हर्जन सादर केले होते. हे व्हर्जन लवकरच भारतीय बाजारात आणले जाऊ शकते. हॅरिअर ईव्ही Tata च्या पोर्टफोलिओमध्ये नेक्सॉन ईव्हीच्या वर ठेवली जाईल. तसेच, टाटा मोटर्स कथितपणे आणखी एक इलेक्ट्रिक SUV लॉन्च करन्यासंदर्भात विचार करत आहे, जी Nexon च्या खोलोखाल प्लेस केली जाऊ शकेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, टाटा पंच मायक्रो SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणले जाऊ शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, टाटा मोटर्सची पंच मायक्रो एसयूव्ही 2023 च्या अखेरपर्यंत लॉन्च लॉन्च करण्याचा प्लॅन आहे. ही कार Gen 2 (सिग्मा) प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. जे टाटा अल्ट्रोजमध्ये वापरले गेलेले ALFA आर्किटेक्चरचे एक संशोधित व्हर्जन आहे. पंच EV दोन बॅटरी पॅक ऑप्शनसह बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे. एक बॅटरी पॅक Tiago EV प्रमाणे 26kWh आणि दुसरा Nexon EV प्रमाणे 30.2kWh बॅटरी पॅक असू शकतो.
मात्र, पंच ईव्हीसंदर्भात टाटा मोटर्सकडून कुठल्याही प्रकारची आधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण ही कार लॉन्च केल्यास, भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही ठरण्याची शक्यता आहे. जिची किंमत अंदाजे 10 ते 14 लाख रुपयांपर्यंत असू शकते.