Electric Car: प्रतीक्षा संपली...! 'या' तारखेला लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 10:46 AM2022-09-16T10:46:50+5:302022-09-16T10:50:39+5:30

Tata Tiago EV ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल. तसेच, ती कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Tigor EV च्या खाली असेल.

Electric Car The wait is over India's cheapest electric car to be launched on september 28 Know the range | Electric Car: प्रतीक्षा संपली...! 'या' तारखेला लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या रेंज

Electric Car: प्रतीक्षा संपली...! 'या' तारखेला लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या रेंज

Next

भारतीय बाजारांत कंपनीचे पुढील लॉन्चिंगं Tiago EV असेल, असे टाटा मोटर्सने नुकेच जाहीर केले आहे. आता ऑल-न्यू टाटा टियागो ईव्ही 28 सप्टेंबर, 2022 रोजी भारतात आपली जागतीक सुरुवात करेल, असे कंपनीने म्हटले आहे. लॉन्च झाल्यानंतर, ही देशात विकली जाणारी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. खरे तर, टाटा टियागो ही कंपनीची एन्ट्री लेव्हल ICE हॅचबॅक कार आहे आणि असेच तिचे इलेक्ट्रिक व्हर्जनही असू शकते.

Tata Tiago EV ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल. तसेच, ती कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Tigor EV च्या खाली असेल. खरे तर, टाटा मोटर्सने अद्याप Tiago EV संदर्भात स्पेसिपिकेशन्स अथवा इतर काही गोष्टींचा खुलासा केलेला नाही. मात्र, टियागो ईव्ही ही कंपनीची इलेक्ट्रिक सेडान Tigor EV सोबत अंडरपिनिंग आणि मॅकेनिकल्स शेअर करू शकते, असे मानले जात आहे. Tigor EV ही भारतात गेल्यावर्षीच PV सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आली होती.

कंपनीकडे आधीपासूनच टिगोर ईव्ही (Tigor EV) आहे, जी कॉम्पॅक्ट सेडान आहे आणि नेक्सॉन ईव्ही (Nexon EV ) जी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. आगामी Tiago EV ही हॅचबॅक असणार आहे. टाटा मोटर्स कंपनी  Ziptron टेक्नॉलॉजी Tiago EV साठी वापरेल, जी Tigor EV आणि Nexon EV साठी वापरत असल्याची शक्यता आहे. Ziptron टेक्नॉलॉजी  Xpres-T टेक्नॉलॉजीपेक्षा अधिक अॅडव्हान्स आहे, जी पूर्वी Tigor EV साठी वापरली जात होती, जी कमर्शियल सेगमेंटमध्ये होती.


 

 

Web Title: Electric Car The wait is over India's cheapest electric car to be launched on september 28 Know the range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.