Electric Scooter: 165 किमीची जबरदस्त रेंज; Activa पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय 'ही' इलेक्ट्रीक स्कूटर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 02:44 PM2021-12-12T14:44:26+5:302021-12-12T14:44:36+5:30
Electric Scooter: या स्कूटरमध्ये दोन बॅटरी आहेत, म्हणजेच या स्कूटरवर दूरपर्यंतचा प्रवासही करता येईल.
बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे. आता बाजारात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हळुहळू या इलेक्ट्रीक गाड्यांचे मायलेज देखील चांगले होत आहे. म्हणजे आता चार्ज केल्यानंतर बॅटरी लवकर संपेल असा विचार करण्याची गरज नाही. आता इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 150 किमी पर्यंत आरामात मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगत आहोत, ज्याची रेंज 165 किमी पर्यंत आहे.
स्पीड आणि चार्जिंग टाइम
आम्ही तुम्हाला आज इलेक्ट्रिक स्कूटर Hero Electric NYX HX बद्दल सांगणार आहोत. ही स्कूटर ड्युअल बॅटरीसह येते, म्हणजे जर तुम्हाला खूप दूर जायचे असेल तर तुम्ही ही स्कूटर घेऊ शकता. या स्कूटरचा टॉप स्पीड 42 किमी प्रतितास आहे. या स्कूटरला पॉवर देण्यासाठी यामध्ये 600 वॅटची मोटर देण्यात आली आहे. Hero Electric NYX HX मध्ये दिलेला बॅटरी पॅक एकदा चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात.
किंमत आणि बॅटरी पॉवर
या स्कूटरमध्ये 51.2 व्होल्ट 30AH बॅटरी पॅक आहे.42 किमी प्रतितास वेगाने चालणाऱ्या स्कूटरसाठी नोंदणी करावी लागेल, तर 25 किमीच्या वेगाची स्कूटर घेण्यसाठी नोंदणीची आवश्यकता नाही. या स्कूटरची किंमत 70834 रुपये आहे. होंडा अॅक्टिव्हाच्या सुरुवातीच्या मॉडेलची दिल्लीतील ऑन-रोड किंमत सुमारे 81,000 रुपये आहे. म्हणजे, एका अॅक्टिव्हापेक्षाही कमी किमतीत ही इलेक्ट्रीक स्कूटर मिळत आहे.
स्कूटरचे फीचर्स
याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात यूएसबी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. स्कूटरच्या पुढील आणि मागील बाजूस 10-इंचाची चाके आहेत. ब्रेकिंगसाठी त्याच्या पुढच्या आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये ड्युअल स्प्लिट सीट आहे जी रायडर आणि मागील सीटरसाठी सोयीस्कर आहे. सामान ठेवण्यासाठी मागील सीट दुमडली जाऊ शकते. अधिक सामान बांधताना थ्री-साइड ग्रॅब रेल उपयोगी पडते.