एथर ते ओलापर्यंत... कोणत्या कंपनीने मे महिन्यात सर्वाधिक स्कूटर विकल्या? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 09:40 PM2023-06-02T21:40:20+5:302023-06-02T21:40:54+5:30

Electric Scooter : मे महिन्यात विकल्या गेलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे आकडे बघून तुम्हाला समजेल की, बाजारात ग्राहकांमध्ये कोणत्या कंपनीच्या स्कूटरला सर्वाधिक मागणी आहे.

electric scooter may sales 2023 check ola or ather which company sells more units  | एथर ते ओलापर्यंत... कोणत्या कंपनीने मे महिन्यात सर्वाधिक स्कूटर विकल्या? जाणून घ्या...

एथर ते ओलापर्यंत... कोणत्या कंपनीने मे महिन्यात सर्वाधिक स्कूटर विकल्या? जाणून घ्या...

googlenewsNext

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ हळूहळू वाढत आहे. सध्या मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर आल्या आहेत. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गेल्या महिन्यात म्हणजेच मे 2023 मध्ये कोणत्या कंपनीने सर्वाधिक स्कूटर विकल्या आहेत. मे महिन्यात विकल्या गेलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे आकडे बघून तुम्हाला समजेल की, बाजारात ग्राहकांमध्ये कोणत्या कंपनीच्या स्कूटरला सर्वाधिक मागणी आहे.

एथर एनर्जी (Ather Energy)
एथर एनर्जीने मागील महिन्याचा विक्री रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे, या बंगळुरूस्थित कंपनीने मे 2023 मध्ये 15 हजार 256 युनिट्स विकल्या आहेत.

ओला इलेक्ट्रिक (OLA Electric)
गेल्या मे महिन्यात कंपनीने इतक्या स्कूटर विकल्या आहेत की, ओला इलेक्ट्रिक सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी बनली आहे. तुमच्या माहितीसाठी कंपनीने मे 2023 मध्ये 35 हजार इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत.

ओकाया (Okaya EV)
ओकाया कंपनीने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरची बंपर विक्रीही केली आहे. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत 140 टक्क्यांनी विक्रीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 3 हजार 875 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बंपर विक्रीचे 'हे' कारण असू शकते
दरम्यान, गेल्या महिन्यात सरकारने जाहीर केले होते की, सरकार 1 जूनपासून FAME II सबसिडी कमी करणार आहे. अशा परिस्थितीत, सर्व कंपन्यांनी घोषणा केली आहे की, 1 जून 2023 पासून कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे मॉडेल महाग करतील. इतकेच नाही तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या 31 मे 2023 पर्यंत मोठ्या ऑफर्सही देत ​​होत्या. 31 मे पर्यंत ग्राहकांना बंपर डिस्काउंट देण्यात येत होते, त्यामुळे मे महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत वाढ होण्यामागे हे एक कारण असू शकते. 

Web Title: electric scooter may sales 2023 check ola or ather which company sells more units 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.