Electric Scooter Sale: ओला इलेक्ट्रीक स्कूटर पुन्हा फेल; देशातील सर्वाधिक खपाची कंपनी कोणती जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 03:22 PM2022-02-04T15:22:25+5:302022-02-04T15:24:18+5:30

Electric Scooter Sale January: ओला इलेक्ट्रीकने गेल्या महिन्यात ४००० स्कूटर विकल्याचा दावा केला होता. परंतू तेवढी रजिस्ट्रेशन झाली नव्हती. डिसेंबरमध्ये ओलाने केवळ १११ स्कूटर विकल्या होत्या, असे फाडाने सांगितले होते.

Electric Scooter Sale: OLA Electric Scooter Fails Again; Find out which is the most sale EV company in the india | Electric Scooter Sale: ओला इलेक्ट्रीक स्कूटर पुन्हा फेल; देशातील सर्वाधिक खपाची कंपनी कोणती जाणून घ्या..

Electric Scooter Sale: ओला इलेक्ट्रीक स्कूटर पुन्हा फेल; देशातील सर्वाधिक खपाची कंपनी कोणती जाणून घ्या..

googlenewsNext

जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रीक स्कूटरचा प्लांट टाकल्याची बिरुदाववली मिरविणारी ओला ईलेक्ट्रीक कंपनी स्कूटरची विक्री करण्यात दुसऱ्या महिन्यातही अपयशी ठरली आहे. तर एथर एनर्जीने पहिल्यांदाच त्यांनी किती स्कूटर विकल्या त्याचा आकडा दिला आहे. देशात सर्वाधिक खपाची इलेक्ट्रीक स्कूटर कोणती याची आकडेवारी समोर आली आहे. याद्वारे तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असलेल्या आणि खरोखरच ग्राहक खरेदी करत असलेल्या स्कूटर कोणत्या याबद्दल समजणार आहे.

ओला इलेक्ट्रीकने गेल्या महिन्यात ४००० स्कूटर विकल्याचा दावा केला होता. परंतू तेवढी रजिस्ट्रेशन झाली नव्हती. डिसेंबरमध्ये ओलाने केवळ १११ स्कूटर विकल्या होत्या, असे फाडाने सांगितले होते. ओलाच्या दाव्यानुसार आता दुसरा महिना देखील संपला आहे, म्हणजे किमान ३९०० स्कूटरची विक्री या महिन्यात नोंदविली जायला हवी होती. परंतू, वाहन पोर्टलनुसार ओलाने जानेवारीत ११०० च्या आसपास स्कूटर विकल्या आहेत. 

हिरो इलेक्ट्रीकने जानेवारीत सर्वाधिक स्कूटर विकल्याचा दावा केला आहे. यानंतर ओकिनावाने स्कूटर विकल्या आहेत. Greaves Cotton च्या मालकीच्या अँपिअरने 4,218 स्कूटर विकल्या आहेत. एथर एनर्जीच्या दाव्यानुसार या कंपनीचा चौथा क्रमांक लागतो. एथरने 2,825 स्कूटर विकल्या आहेत. ओकिनावाने  5,611 स्कूटर विकल्या आहेत. टीव्हीएस, बजाज, रिव्होल्ट आदी कंपन्यांनी याच्या खालोखाल स्कूटरची विक्री केली आहे. 

वाहन पोर्टलवर अद्याप आंध्र प्रदेश, तेलंगाना, मध्य प्रदेश, लक्षद्वीप आदी राज्ये नाहीत. यामुळे हे आकडे थोडेफार वाढू शकतात. परंतू एकंदरीत आकडेवारी पाहता आसाच ट्रेंड असणार आहे. यामुळे तुम्हाला सोशलवर ट्रेंडिंग आणि रस्त्यावर चालणाऱ्या स्कूटर कोणत्या याचा अंदाज आला असेल. 

Web Title: Electric Scooter Sale: OLA Electric Scooter Fails Again; Find out which is the most sale EV company in the india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.