दिवाळीत स्कूटर घ्यायचा विचार करताय? इलेक्ट्रीक घ्यावी की पेट्रोल...जाणून घ्या बचतीचं अचूक गणित!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 12:46 PM2022-09-29T12:46:54+5:302022-09-29T12:47:21+5:30

नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे आणि त्यानंतर लगेचच दिवाळीचे वेध लागतील. दिवाळी म्हटलं की खरेदीचा उत्साह असतो. दिवाळीच्या मुहूर्तावर घरात नवीन वाहन खरेदीची चांगली संधी असते.

electric scooter vs petrol scooter running cost calculator which is best | दिवाळीत स्कूटर घ्यायचा विचार करताय? इलेक्ट्रीक घ्यावी की पेट्रोल...जाणून घ्या बचतीचं अचूक गणित!

दिवाळीत स्कूटर घ्यायचा विचार करताय? इलेक्ट्रीक घ्यावी की पेट्रोल...जाणून घ्या बचतीचं अचूक गणित!

googlenewsNext

नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे आणि त्यानंतर लगेचच दिवाळीचे वेध लागतील. दिवाळी म्हटलं की खरेदीचा उत्साह असतो. दिवाळीच्या मुहूर्तावर घरात नवीन वाहन खरेदीची चांगली संधी असते. सणासुदीच्या हंगामात वाहन कंपन्या ग्राहकांसाठी दिवाळी धमाका ऑफरही घेऊन येत असतात. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, परंतु पेट्रोल आणि इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुमचा गोंधळ उडत असेल तर आज आम्ही तुमच्या समस्येचं निराकरण करणार आहोत. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना नेमकी बचत कशी करता येईल हे जाणून घेऊयात. 

सर्वातआधी इलेक्ट्रिक स्कूटर आणि पेट्रोल स्कूटरमध्ये काय फरक आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॅटरी सेटअप आणि मोटर वापरली जाते. यामध्ये अनेक भागांच्या मदतीनं एक सेटअप तयार केला जातो, जो वेग नियंत्रणापासून ते चार्जिंगपर्यंत मदत करतो. पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या स्कूटरमध्ये अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE Engine) असतं. यामध्ये पेट्रोलचा वापर इंधन म्हणून केला जातो, जो सध्या अनेक राज्यांमध्ये ९० ते १०० रुपये प्रति लिटर इतका आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरवर येणारा खर्च
इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर, स्कूटरची बॅटरी चार्ज करण्यासाठी साधारणतः ५-६ युनिट खर्च येतो, ज्याला तुम्ही तुमच्या क्षेत्राच्या प्रति युनिट खर्चानं जोडलं की तुम्हाला एका दिवसाचा खर्च जाणून घेता येईल. त्यानंतर ती रक्कम ३० दिवसांनी गुणाकार करा. उदाहरणार्थ, तुमच्या भागात प्रति युनिट खर्च ३ रुपये आहे आणि ६ युनिट्स एका दिवसाच्या बॅटरी चार्जवर खर्च होतात. तर ३० दिवसांचा खर्च ५६० रुपये इतका होतो.

पेट्रोल स्कूटरवर येणारा खर्च
पेट्रोल स्कूटरमध्ये चालकांना त्यांच्या एका दिवसाची किंमत वजा करावी लागेल. जर तुम्ही एका दिवसात ५० किलोमीटर गाडी चालवली तर एका दिवसात सुमारे १ लिटर पेट्रोल खर्च होईल, ज्याची किंमत ९० ते १०० रुपये असू शकते. तुमच्या परिसरात ९० रुपये प्रति लिटर पेट्रोल असेल तर रोजचा खर्च ९० रुपये इतका येईल. मग ३० दिवसांचा खर्च २,७००  रुपयांपर्यंत असू शकतो.

Web Title: electric scooter vs petrol scooter running cost calculator which is best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.