'या' राज्यात २७ हजार रूपयांनी स्वस्त झाल्या Electric Scooter; सरकारकडून देण्यात आली मोठी सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 03:43 PM2021-07-07T15:43:20+5:302021-07-07T15:44:13+5:30
Electric Scooters : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाढत आहे इलेक्ट्रीक वाहनांची मागणी. केंद्रासह राज्य सरकारही इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीसाठी देत आहे प्रोत्साहन.
देशातील प्रमुख इलेक्ट्रीक वाहन उत्पादक करंपनी एम्पिअर व्हेईकल्सनं आपल्या इलेक्ट्रीक स्कूटर्स मॅग्नस आणि झीलच्या किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. ही कपात गुजरातमध्ये लागू होणार आहे. गुजरातसरकारद्वारे नव्या गुजरात इलेक्ट्रीक व्हेईकल पॉलिसी २०२१ ची घोषणा करण्यात आली आहे. तसंच केंद्रानंही यापूर्वी FAME-II सब्सिडीमध्ये बदल केले होते. त्यानंत कंपनीनं ही कपात केली असून ग्राहकांना तब्बल २७ हजार रूपयांचा फायदा होणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानंतर एम्पियरच्या या दोन्ही इलेक्ट्रीक स्कूटर्सच्या किंमती आता गुजरातमध्ये ५० हजार रूपयांपेक्षा कमी झाल्या आहेत. एम्पियर मॅग्नस इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत आता गुजरातमध्ये ४७,९९० रूपये झाली आहे. तर झील मॉडेलची किंमत आता ४१,९९० रूपये एक्स शोरूम इतकी झाली आहे.
एम्पियर व्हेईकल्स ही पहिली कंपनी नाही ज्यांनी मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. FAME-II मध्ये सुधारणा केल्यानंतर वाढवण्यात आलेल्या अनुदानामुळे अनेक दिग्गज कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमतीत कपात केली होती. FAME-II मध्ये सुधारणा केल्यानंतर बंगळुरूतील एथर या कंपनीनं आपल्या एथर 450X या इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली होती. आपल्या स्कूटरच्या किंमतीत कपात करणारी ती पहिली कंपनी ठरली होती.