क्रूझ कंट्रोल, ब्लूटूथसह 100 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Komaki Flora इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 01:41 PM2022-12-01T13:41:23+5:302022-12-01T13:42:18+5:30
Komaki Flora Electric Scooter : स्कूटरच्या किमतींसह राइडिंग रेंज, टॉप स्पीड, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या...
नवी दिल्ली : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच कोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर (Komaki Flora Electric Scooter) सध्या चर्चेत आहेत. या स्कूटरच्या किमतींसह राइडिंग रेंज, टॉप स्पीड, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या...
Komaki Flora Electric Scooter Price
कोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने स्कूटरला फक्त एका स्टँडर्ड व्हेरिएंटसह बाजारात लाँच केले आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 79,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
Komaki Flora Electric Scooter Battery and Motor
कोमाकी फ्लोरा 3000W पॉवरसह इंटीरियर परमनंट मॅग्नेट ब्रशलेस मोटरसह लिथियम आयन बॅटरी बसवण्यात आली आहे. या बॅटरीच्या चार्जिंगबाबत कोमाकीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर 4 ते 5 तासांत फूल चार्ज होते.
Komaki Flora Electric Scooter Range
कोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा फूल चार्ज केल्यानंतर 80 ते 100 किलोमीटरची राइडिंग रेंज देते.
Komaki Flora Electric Scooter Braking and Suspension
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक बसवण्यात आला आहे, यासह रिअर व्हीलमध्येही ड्रम ब्रेक देण्यात आला आहे, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे. स्कूटरच्या सस्पेन्शन सिस्टिमबद्दल बोलायचे झाले तर, पुढील बाजूस हायड्रॉलिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस स्प्रिंग बेस्ड सस्पेंशन सिस्टीम जोडण्यात आली आहे.
Komaki Flora Electric Scooter Features
पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल स्पीडोमीटर, क्रूझ कंट्रोल, व्हायब्रंट डॅशबोर्ड, सेल्फ डायग्नोस्टिक, एडिशन बॅक रेस्ट, पार्किंग मोड, गियर मोड, ईबीएस, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प असे फीचर्स कंपनीने कोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिले आहेत.