Electric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या! HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 04:02 PM2021-07-31T16:02:48+5:302021-07-31T16:03:29+5:30
EV Charging Station On HP Petrol Pump: हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum Corporation Limited ) आपल्या पंपांवर ईलेक्ट्रीक गाड्यांच्या चार्जिंगची सोय करणार आहे. एचपीसीएल (HPCL) सुरुवातीला देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींनी ग्राहकांना सीएनजी आणि ईलेक्ट्रीक वाहनांकडे (Electric Vehicles) वळविले आहे. मात्र, सीएनजी पंप (CNG) आणि इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन (EV Charging Station) नसल्याने अनेकजण या गाड्या घेण्यापासून कचरत आहेत. अनेकांच्या मनात चार्जिंग स्टेशन नाहीत, मग लांबच्या पल्ल्याला गेल्यावर किंवा मध्येच चार्जिंग संपल्यावर काय करायचे असा प्रश्न सतावत आहे. परंतू आता ईव्ही घेणाऱ्यांच्या मनातील ही भीती दूर होणार आहे. (HPCL will biuld charging Station on its Petrol Pumps.)
कारण हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum Corporation Limited ) आपल्या पंपांवर ईलेक्ट्रीक गाड्यांच्या चार्जिंगची सोय करणार आहे. एचपीसीएल (HPCL) सुरुवातीला देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. यासाठी एचचीने राज्यांद्वारे संचालित कन्वर्जेंस एनर्जी सर्विसेज लिमिटेड (CESL) सोबत हातमिळवणी केली आहे. हा करार पुढील १० वर्षांसाठी असून याद्वारे एचपीच्या रिटेल आऊटलेटचा वापर करण्यात येणार आहे.
सीईएसएलचे एमडी महुआ आचार्य यांनी सांगितले की, तांत्रिक दृष्या चांगले चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी हा करार झाला आहे. परिवाहन क्षेत्राला डिकार्बनाईज करण्यासाठी याचा उपयोग होईल. एचपीसीएलकडे शहरांमध्ये चांगल्या जागा आहेत. शहरांमध्ये हे चार्जिंग स्टेशन कुठे आहेत, याची माहिती मिळण्यासाठी एक अॅप असणार आहे. तसेच एचपीसीएल कडून जाहिरातीसाठी देखील मदत घेतली जाणार आहे. महामार्ग, शहरे आधी ईव्ही चार्जिंग स्टेशन युक्त केली जाणार आहेत.