Elesco Electric Scooters: 100Km ची रेंज अन् किंमत खूपच कमी; बाजारात दोन नवीन EV स्कूटर लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 06:14 PM2023-04-16T18:14:39+5:302023-04-16T18:15:43+5:30
भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी झपाट्याने वाढत आहे.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी Elesco ने भारतीय बाजारात दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. V1 आणि V2 अशी या नवीन EV ची नावे आहेत. दोन्ही स्कूटरची किंमत 69,999 रुपये एक्स-शोरूमपासून सुरू होते. कंपनीचा दावा आहे की, शहरात आरामदायक प्रवास करण्यासाठी या स्कूटर एकदम योग्य आहेत. या दोन्हीची किंमत एकच आहे, परंतु दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फरक आहे.
मोटर, बॅटरी आणि रेंज
Elesco V1 ची मोटर 2.5 kW पॉवर निर्माण करते, तर Elesco V2 ची इलेक्ट्रिक मोटर 4 kW ची कमाल पॉवर निर्माण करते. दोन्ही स्कूटरना 2.3 kWh चा बॅटरी पॅक मिळतो, जो पूर्ण चार्ज होण्यासाठी 6-7 तास घेतो. मागील चाक 72V इलेक्ट्रिक हब मोटरद्वारे समर्थित आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर्सना एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 80 ते 100 किलोमीटरची रेंज देतात.
फीचर्स
दोन्ही स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोबाइल अॅप्लिकेशन कंट्रोल, जीपीएस आणि इंटरनेट कंपॅटिबिलिटी, कीलेस इग्निशन आणि साइड स्टँड सेन्सर यासारखे फीचर्स येतात. दोन्ही स्कूटरवरील इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये एलईडी युनिट आहे. दोन्ही स्कूटर 3 वर्षांच्या वॉरंटीसह येतात.
ब्रेकिंग आणि सस्पेंशन
समोरच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक दिले आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले, तर याला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक युनिट आणि मागील बाजूस कॉइल स्प्रिंग आहे. V1 ला 10-इंच चाके मिळतात तर V2 ला 12-इंच चाक मिळतात. दोन्ही स्कूटरची लोडिंग क्षमता 200 किलो आहे.