Elon Musk Meet Pranay Pathole: एकतरी पुणेकर मित्र हवाच! एलन मस्कना देखील पडली भुरळ; प्रणयशी झाली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 01:23 PM2022-08-23T13:23:16+5:302022-08-23T13:23:49+5:30
तुम्ही विचार करत असाल मस्क यांच्यासोबत फोटोत जो भारतीय तरुण दिसतोय तो नेमका कोण आहे? तो पुणेकर आहे. तो मस्क यांना कसा भेटला...
जगविख्यात आणि सर्वाधिक श्रीमंत एलन मस्क यांच्याशी मैत्री कोणाला नको असते? जगभरातील मोठमोठे उद्योजक असतील किंवा प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री सगळेच मस्क यांच्याशी मैत्री करण्यासाठी धडपडत असतात. परंतू, याच मस्क यांना एका पुणेकराने भुरळ घातली होती. अखेर त्यांची भेट झाली आहे.
तुम्ही विचार करत असाल मस्क यांच्यासोबत फोटोत जो भारतीय तरुण दिसतोय तो नेमका कोण आहे? तो पुणेकर आहे. तो मस्क यांना कसा भेटला... तर मस्क यांनी या पुणेकरातील मैत्री ही २०१८ पासूनची आहे. प्रणय पाथोळे याने मस्क यांची कंपनी टेस्लाच्या ईलेक्ट्रीक कारमधील एक समस्या शोधली होती. ऑटोमेटिक विंडस्क्रीन वायपर पावसामध्ये नीट काम करत नाही हे त्याने मस्क यांना ट्विट करून सांगितले होते. ही समस्या शोधल्याबद्दल मस्क यांनी त्याचे आभारही मानले होते.
यावेळी मस्क यांनी त्याला पुढील फेसलिफ्ट लाँचवेळी ही समस्या ठीक केली जाईल असे आश्वासन दिले होते. यानंतर दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. मस्क अनेकदा प्रणयच्या ट्विटवर कमेंटही करतात. दोघे डायरेक्ट मेसेजद्वारे बोलतातही. परंतू त्यांची भेट काही झाली नव्हती. आज अखेर या दोघांची भेट झाली.
प्रणय पाथोळे याने बिझनेस अॅनालिटिक्समध्ये मास्टर ऑफ सायन्स (एमएस) केले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्येही काम केले आहे. त्याने मस्क सोबतचा फोटो शेअर करताच इंटरनेटवर चर्चा सुरु झाली आहे.
It was so great meeting you @elonmusk at the Gigafactory Texas. Never seen such a humble and down-to-earth person. You're an inspiration to the millions 💕 pic.twitter.com/TDthgWlOEV
— Pranay Pathole (@PPathole) August 22, 2022
'गिगाफॅक्टरी टेक्सासमध्ये तुमच्यासोबतची भेट खूप छान होती. त्यांच्यासारखा उदात्त आणि उदार माणूस पृथ्वीवर कधीच पाहिला नाही. तुम्ही करोडो लोकांसाठी प्रेरणास्थान आहात, असे ट्विट प्रणयने केले आहे.