गडकरी खरे ठरले! एलन मस्क यांच्या टेस्लाची भारतात एन्ट्री; या 'बड्या' शहरात होणार उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 08:08 AM2021-01-13T08:08:44+5:302021-01-13T08:14:17+5:30

Tesla Electric Car: इलेक्ट्रीक वाहनांसाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्र सरकारच्या योजनेला मोठा बूस्ट मिळाला आहे. 'टेस्लाची 8 जानेवारीला नोंदणी करण्यात आली आहे.

elon Musk's Tesla entry into India; Production will take place in Bengaluru | गडकरी खरे ठरले! एलन मस्क यांच्या टेस्लाची भारतात एन्ट्री; या 'बड्या' शहरात होणार उत्पादन

गडकरी खरे ठरले! एलन मस्क यांच्या टेस्लाची भारतात एन्ट्री; या 'बड्या' शहरात होणार उत्पादन

googlenewsNext

अवघ्या काही दिवसांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आणि दुसऱ्या क्रमांकावर आलेले दिग्गज उद्योजक एलन मस्क यांच्या इलेक्ट्रीक कार आता भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. टेस्लाने अधिकृतरित्या भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. टेस्लाने टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्राइवेट लिमिटेड (Tesla India Motors and Energy Pvt Ltd with RoC Bangalore) या नावे रजिस्ट्रेशन केले असून भारतीय बाजारात लक्झरी इलेक्ट्रीक कारचे उत्पादन आणि विक्री करण्यात येणार आहे. 


इलेक्ट्रीक वाहनांसाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्र सरकारच्या योजनेला मोठा बूस्ट मिळाला आहे. टेस्ला बंगळुरुमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटद्वारे काम सुरु करणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी टेस्लाचे स्वागत केले. 8 जानेवारीला नोंदणी करण्यात आली आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हीड जॉन फेंस्टीन कंपनीचे संचालक आहेत. तनेजा टेस्लाचे सीईओ आहेत. उर्वरीत दोघे संचालक पदावर आहेत. कंपनी भारतात मॉडेल ३ लाँच करण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत या कारची विक्री सुरु होऊ शकते. 


या कारची किंमत 55 लाख रुपये एवढी असेल, ही अफवा - 
असे बोलले जाते, की टेस्ला कारची आयात चीनवरून करण्याची शक्यता आहे आणि त्या ऑनलाईनच विकेल. डिलरशिपच्या माध्यमाने कारची विक्री होणार नाही. या कारची किंमत 55 लाख रुपये एवढी असेल, ही अफवा आहे. या कारमध्ये 500 किलोमीटरपर्यंतची रेंज आणि 162 किमी प्रति तासची टॉप स्पिड असेल. मात्र, यासंदर्भात कंपनीने अधिकृत भाष्य केलेले नाही.


गडकरींनी केले होते सुतोवाच
नितीन गडकरी यांनी देशातील इलेक्ट्रिकल कारच्या आवश्यकतेवर भाष्य केले. ते म्हणाले, अनेक भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल गाड्यांवर काम करत आहेत. ज्यांच्या गाड्यांची किंमती कमी होऊ शकते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या टेस्ला फार प्रगत आहे. टेस्ला विक्रीबरोबर आपल्या कामकाजाला सुरुवात करेल. यानंतर कारच्या बाबतीत लोकांचा प्रतिसाद पाहून ते गाड्यांच्या असेम्बल आणि उत्पादनानंदर्भात विचार करतील. एवढेच नाही, तर पुढील पाच वर्षांत भारत क्रमांक एकचे मॅन्युफॅक्चरिंग हब होईल, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

 

Web Title: elon Musk's Tesla entry into India; Production will take place in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.