सायकलसारखी दिसणारी E-Bike, किंमत ५ लाख! लॉन्च झाली EMotorad ची नवी रेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 20:45 IST2023-01-20T20:43:45+5:302023-01-20T20:45:03+5:30
पुणे स्थित इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) स्टार्टअप EMotorad नं आज आपल्या E-Bikes ची नवी रेंज लॉन्च केली आहे.

सायकलसारखी दिसणारी E-Bike, किंमत ५ लाख! लॉन्च झाली EMotorad ची नवी रेंज
नवी दिल्ली-
पुणे स्थित इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) स्टार्टअप EMotorad नं आज आपल्या E-Bikes ची नवी रेंज लॉन्च केली आहे. यात प्रिमियम आणि स्वस्त अशा दोन्ही रेंज उपलब्ध आहेत. सायकलसारखी दिसणारी ही ई-बाइक खूप खास आहे. जागतिक बाजारात इलेक्ट्रिक सायकलला E-Bike संबोधलं जातं. कंपनीनं आज या प्रकारात एलीट रेंज सादर केली आहे. यात अल्ट्रा-प्रीमियम डेजर्ट ईगल (Desert Eagle) आणि नाइटहॉक (Nighthawk) याचा समावेश आहे. याशिवाय कंपनीनं X-Factor रेंज देखील लॉन्च केली आहे. यात एक्स-१, एक्स-२ आणि एक्स-३ बाइकचा समावेश आहे.
EMotorad नं या ई-बाइक्स दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि गुरूग्राम सारख्या शहरांना डोळ्यासमोर ठेवून तयार केल्या आहेत. जिथं खूप ट्राफिक असतं. खासकरुन कामकाजाच्या वेळेत रस्त्यावर खूप ट्राफिक होतं यात कामाला जाणाऱ्यांची गैरसोय होते. यावरच तोडगा म्हणून ई-बाइक तयार करण्यात आली आहे.
ई-बाइकची किंमत किती?
EMotorad नं डेजर्ट इगल आणि नाइटहॉकची किंमत प्रीमियम रेंजवर ठेवली आहे डेजर्ट इगल किंमत ४,७५,००० रुपये आणि नाइटहॉकची किंमत ५ लाख रुपये आहे. कंपनीची ही सर्वात महागडी रेंज आहे. याच किमतीत तुम्ही एक एन्ट्री लेव्हल कार देखील खरेदी करू शकता. जसं की मारुती ऑल्टो, रेनोल्ट क्विड इत्यादी. याशिवाय देशातील सद्याच्या हायरेंज इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती जवळपास १.२५ लाख रुपयांपासून सुरू होतात. तर एक्स-फॅक्टर रेंजमध्ये X1 ची किंमत २४,९९९ रुपये, X2 ची किंमत २७,९९९ रुपये आणि X3 ची किंमत ३२,९९९ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.