Auto Expo मध्ये ईव्हीचे वर्चस्व; 300 KM रेंज असलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 03:04 PM2023-01-12T15:04:53+5:302023-01-12T15:05:33+5:30

या मालिकेत इंडिया मेड सुपर बाईक अल्ट्राव्हॉयलेटने आपल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचे दोन मॉडेल्सही लाँच केले आहेत.

EV dominates the auto expo ultraviolate superbike launched | Auto Expo मध्ये ईव्हीचे वर्चस्व; 300 KM रेंज असलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल

Auto Expo मध्ये ईव्हीचे वर्चस्व; 300 KM रेंज असलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल

Next

नवी दिल्ली :ऑटो एक्स्पो 2023 मध्ये संपूर्ण फोकस सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर दिसत आहे. कंपन्या एकापाठोपाठ एक इलेक्ट्रिक कार आणि मोटरसायकल बाजारात आणत आहेत. या मालिकेत इंडिया मेड सुपर बाईक अल्ट्राव्हॉयलेटने आपल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचे दोन मॉडेल्सही लाँच केले आहेत. बंगळुरूस्थित कंपनी अल्ट्राव्हॉयलेटच्या या मोटारसायकल तरुणाईच्या पसंतीला उतरतील.

अल्ट्राव्हॉयलेटने आपल्या दोन मोटारसायकल F77 ओरिजिनल आणि द रीकॉन सादर केल्या आहेत. या दोन्ही मोटरसायकल खास फीचर्ससह येतात. या मोटरसायकलचे एक सर्वात मोठे फीचर्स म्हणजे एका चार्जमध्ये त्यांची रेंज आहे. ओरिजिनल सिंगल चार्जमध्ये सुमारे 206 किमी आणि रीकॉन 307 किमीची रेंज देते. मोटरसायकलचा लूक खूपच शानदार आहे. याला हेवी लूक देण्यासोबतच ते अतिशय स्लीक देखील बनवण्यात आले आहे, जे त्याची खासियत आहे. यामध्ये स्पोर्टी सिटिंग पोस्‍चर देण्यात आले आहे. मोटारसायकल लाँग राइडसाठी तयार करण्यात आली आहे.

मोटरसायकलमध्ये पॉवरची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. तिचा टॉप स्पीडही खूप जास्त आहे. ओरिजनलबद्दल सांगायचे झाले तर ती 140 किमी प्रति तास वेग पकडते. तर रीकॉन मॉडेलचा टॉप स्पीड सुमारे 147 किमी प्रती तास आहे. मोटारसायकलमध्ये 7.1 आणि 10.3 kWh बॅटरी बसवण्यात आल्या आहेत. कंपनी या दोन्ही बॅटरी पॅकवर 8 वर्षांची वॉरंटी देत ​​आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मोटरसायकल सामान्य चार्जरने 9 तासांत आणि फास्ट चार्जरने 3.5 तासांत पूर्ण चार्ज होते.

याचबरोबर, मोटरसायकल तीन कलरमध्ये उपलब्ध आहे. सुपरसोनिक सिल्व्हर, स्टेल्थ ग्रे आणि प्लाझ्मा रेड कलरमध्ये ही मोटरसायकल अतिशय आकर्षक दिसते. मोटारसायकलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास ओरिजनल मॉडेल 3.80 लाख रुपये आणि रीकॉन मॉडेल 4.55 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.

Web Title: EV dominates the auto expo ultraviolate superbike launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.