ऑटो इंड्रस्टीही होतेय आता 'स्मार्ट', अब की बार ‘स्मार्ट’ टायर्स…
By जयदीप दाभोळकर | Published: February 19, 2023 03:39 PM2023-02-19T15:39:00+5:302023-02-19T15:39:52+5:30
तुम्ही स्मार्टफोन, स्मार्टवॉच असे शब्द यापूर्वी नक्कीच ऐकले असतील. पण तुम्ही स्मार्ट टायर असं कधी ऐकलंय?
तुम्ही स्मार्टफोन, स्मार्टवॉच असे शब्द यापूर्वी नक्कीच ऐकले असतील. पण तुम्ही स्मार्ट टायर असं कधी ऐकलंय? ऑटोमोबाईल कंपन्या वाहनांच्या इंजिनपासून ते फीचर्सपर्यंत सर्वकाही स्मार्ट करतायत. स्मार्ट फीचर्समुळे कार चालवणंही सोपं होतंय. पण आता टायर कंपन्यांही यात मागे राहिलेल्या नाहीत. जेके टायर्स या कंपनीचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. या कंपनीची सहाय्यक कंपनी ट्रीलनं आता स्मार्ट टायर्स बाजारात आणलेत. हे प्रामुख्यानं इलेक्ट्रीक
वाहनांसाठी तयार करण्यात आलेत. याच्या मदतीनं तुमच्या ईव्हीची रेंजही वाढेल.
जे लोक आपल्या कार्समध्ये या कंपन्यांचे टायर्स वापरत आहेत, त्यांना हे स्मार्ट टायर्स घेता येतील. यासाठी खर्चही तसा केवळ ३ हजार रुपयांचा असेल. या स्मार्ट टायर्सवर सेन्सर्स लावण्यात आले आहेत. टेम्परेचर किंवा प्रेशर वाढलं अथवा पंक्चर झालं तर ड्रायव्हरच्या मोबाईल ॲपवर या सेन्सर्सच्या मदतीनं अलर्ट पाठवला जाईल.
ईव्ही ग्राहकांसाठी तयार केलेल्या रेंजर एच पी टायर्ससाठी ओईएमसोबत चर्चाही सुरू आहे. हार्ड सर्फेसचा सामना करण्यासाठी तयार केलेले रेंजर X-AT हे एसयुव्हींसाठी तयार करण्यात आलेत. टायर्स तयार करणाऱ्या कंपन्या निरनिराळ्या सेगमेंटच्या वाहनांसाठी टायर्स तयार करत आहेत.