Evtric Motors: ईव्हट्रीकने आणली एक मोटरसायकल, दोन स्कूटर; जाणून घ्या रेंज आणि वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:58 PM2021-12-24T19:58:19+5:302021-12-24T20:01:10+5:30

Evtric Motors showcased three two wheelers: ग्रेटर नोएडाच्या इंडिया एक्सपो सेंटरमध्ये सुरु असलेल्या ईव्ही इंडिया एक्सपो 2021 या तीन टू व्हीलर शोकेस करण्यात आल्या. 

Evtric Motors: one motorcycle Evtric Rise, two scooters Mighty and Evtric Ride Pro; Know range and speed | Evtric Motors: ईव्हट्रीकने आणली एक मोटरसायकल, दोन स्कूटर; जाणून घ्या रेंज आणि वेग

Evtric Motors: ईव्हट्रीकने आणली एक मोटरसायकल, दोन स्कूटर; जाणून घ्या रेंज आणि वेग

googlenewsNext

Evtric Motors ने शुक्रवारी हाय स्पीड कॅटेगरीमध्ये तीन नवीन इलेक्ट्रीक मोटरसायकल आणि स्कूटर भारतीय बाजारात आणल्या आहेत. यामध्ये Evtric Rise (मोटरसाइकिल), Mighty (स्कूटर) आणि Evtric Ride Pro (स्कूटर) आहेत. ग्रेटर नोएडाच्या इंडिया एक्सपो सेंटरमध्ये सुरु असलेल्या ईव्ही इंडिया एक्सपो 2021 या तीन टू व्हीलर शोकेस करण्यात आल्या. 

बाईकचा वेग आणि रेंज
Evtric Rise इलेक्ट्रिक बाइकमध्ये काढता येणारी 3.0 KWH लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. या बॅटरीला फुल चार्ज केल्यावर ही बाईक 120 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. Evtric Rise चा सर्वाधिक वेग हा 100 किमी प्रति तास आहे. 

दोन स्कूटरचा वेग आणि रेंज
याशिवाय कंपनीने दोन स्कूटर Mighty आणि Ride Pro देखील दाखविल्या आहेत. Ride Pro ही एक हाय स्पीड ई स्कूटर आहे. याचा ट़ॉप स्पीड 75 किमी प्रति तास आहे. एकदा चार्ज केली की 90 किमीचे अंतर कापते. कंपनीने आणखी एक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरचे नाव मायटी आहे. या स्कूटरचा वेग 70 किमी प्रति तास असून ती देखील एकदा चार्ज केल्यावर 90 किमीचे अंतर कापू शकते. 

इव्हट्रिक मोटर्सचे संस्थापक आणि एमडी मनोज पाटील म्हणाले, “संपूर्ण इव्हट्रिक टीम भारतातील ईव्ही दुचाकी उद्योगात दर्जा उंचावणारी दर्जेदार उत्पादने सादर करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. उद्योगातील मान्यवर, अभ्यागत, वाहन तज्ज्ञ आणि वापरकर्ते यांच्याकडून प्रशंसा मिळवणाऱ्या नवकल्पनांचे प्रदर्शन करण्याची आम्हाला योग्य संधी आहे."

Web Title: Evtric Motors: one motorcycle Evtric Rise, two scooters Mighty and Evtric Ride Pro; Know range and speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.