एक्स्प्रेस-वे वर अतिवेग, अनियंत्रण, अतिआत्मविश्वास हा जीवघेणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 10:08 PM2017-10-23T22:08:16+5:302017-10-23T22:08:43+5:30

एक्स्प्रेस-वे वर ड्रायव्हिंग करणे म्हणजे रेसिंग नाही. तेथे कायम तीन गोष्टी टाळा त्या म्हणजे वाहनाचा अतिवेग, वाहनावरील अनियंत्रण व चालनावरील अतिआत्मविश्वास.

Extravagance, uncontrolledness, superstition over the expressway is a life threatening | एक्स्प्रेस-वे वर अतिवेग, अनियंत्रण, अतिआत्मविश्वास हा जीवघेणा

एक्स्प्रेस-वे वर अतिवेग, अनियंत्रण, अतिआत्मविश्वास हा जीवघेणा

Next

मुंबई - एक्स्प्रेस वे हा अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मुंबई-पणे एक्स्प्रेस-वे वर रस्त्याची स्थिती फार सुखावह नाही. त्यामुळे मुळात तेथे वाहनचालन करताना अतिशय सावधपणे व अतिवेगाने चालवण्याची गरज नाही. दुभाजक असूनही त्याला धडकून दुसऱ्या बाजूच्या वाहनाला धडक देण्याच्या भीषण अपघातात काही काळापूर्वी एका ज्येष्ठ व गुणी नाट्य कलावंताचा मृत्यू झाला होता. त्याच्याबरोबर एका नव्या कालकारालाही आपले प्राण गमवावे लागले होते. अशा प्रकारचा हा अपघात म्हणजे एकंदरच वाहतूक नियम न पाळण्याचा व बेदरकार वाहनचालनाचा नमुना आहे. आजही हा एक्स्प्रेस-वे म्हणजे विविध प्रकारच्या अपघातांचे नमुनेदार संग्रहालय झाल्यासारखे झाले आहे. रांग तोडून ओव्हरटेक करताना होणारा अपघात, रस्त्याच्या बाजूला बिघडलेल्या वाहनांवर व त्यामागे असलेल्या पप्रवाशांनाही धडक देण्याचा अपघात, मोठ्या वाहनांच्या विविध प्रकारच्या त्रुटींमुळे होणारे अपघात, अतिवेग, वाहनावरील अनियंत्रण आणि फाजील आत्मविश्वास हे या महामार्गावरच्या अपघातांमागचे प्रमुख निष्कर्ष असल्याचे जाणवते.

एक्स्प्रेस वे वर वाहनाचा कमाल वेग ताशी ८० किलोमीटर इतका ठेवण्यात आला आहे. मात्र जवळजवळ ९५ टक्के वाहने येथे त्यापेक्षा जास्त वेगाने जाणारी असतात. घाटामध्ये अमृतांजन पॉइंट हा अपघाताचा उच्चबिंदूच आहे. हळूहळू महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर या प्रकारचे रस्ते बनत आहे. विभाजक नसलेल्या रस्त्यावर, महामार्गावर अपघात जास्त होत असल्याचा सर्वसाधारण वाहनचालकांचा दावा असतो. मात्र एक्स्प्रेस वे सारखे रस्ते देऊन लवकर जाण्याचे व गतीमान वाहतूक करण्याचे उद्दिष्ट जर असले तर मात्र अपघाताचे प्रमाण या एक्सप्रेसवेवर वाढणार आहे. याला जसे रस्त्याच्या बांधणीमध्ये परिपूर्णत्त्व नसल्याचेही कारण असते. तसेच वाहनांच्या चालकांचा अतिआत्मविश्वास व अतिवेग ही दोन कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. या द्रुतगती महामार्गावर वाहने चालवणे अद्यापही परिपक्क्व झालेले दिसत नाही. येथे ड्रायव्हिंग कसे करायचे हे समजून घ्यायला हेव, तरच अपघातांचे प्रमाण खूप कमी होऊ शकेल.

ठळक मुद्दे
- अतिवेग टाळा, संतुलीत व वेगमर्यादेनुसार वाहन चालवा
- वाहन तुमच्या रांगेत रांगेच्या वेगानुसारच चालवा
- उज्व्या बाजूच्या पिहल्या रांगेत वेग कमाल ८० असावा अशी अपेक्षा आहे.
-  विनाकारण तुमची रांग ओलांडून दुसर्या लाइनीत जाऊ नका.
- रांग वा लाइन बदलताना सिग्नल योग्य त्यावेळी द्या
- रात्रीच्यावेळी अप्पर डिप्परचा वापर करीत ओव्हरटेक करा
- डाव्या वा उजव्या बाजूने वाहनाला ओव्हरटेक करता येते मात्र सिग्नलींग व सुरक्षितता महत्त्वाची
- रस्त्याच्या बाजूला विनाकारण थांबू नका
- टोल नाक्यावर घाई करून दुसर्या रांगेत घुसू नका
- घाटामध्ये ओव्हरटेक करण्यासाठी उतावळे होऊ नका
- घाटामध्ये अवजड वाहनाला उतावळेपणाने ओव्हरटेक करायचा प्रयत्न टाळा
- योग्य गीयर व योग्य वेग हे चांगल्या चालनाचे लक्षण आहे, इंधन बचतीचेही साधन आहे
- रस्त्याच्या बाजूला वाहन थांबवायची गरज पडली तर पार्किंग लाइट चालू ठेवा. 
- द्रुतगती मार्गावरील सूचनांचे नीट अवलंबन करा
- हा मार्ग म्हणजे रेसिंगसाठी नाही हे लक्षात ठेवा
- अतिवेग, अनियंत्रण, अतिआत्मविश्वास या तीन बाबी टाळाच.
 

Web Title: Extravagance, uncontrolledness, superstition over the expressway is a life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.