FAME-II संपली: ईलेक्ट्रीक वाहनांवर आजपासून नवीन सबसिडी; आता किती मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 11:47 AM2024-04-01T11:47:30+5:302024-04-01T11:48:20+5:30
NEW Subsidy on EV, How Much rupees Get: १ एप्रिल म्हणजेच आजपासून ही सबसिडी बंद झाली आहे. अर्थसंकल्पात केंद्राने नवीन सबसिडी जाहीर केली होती. ती आता सुरु झाली आहे.
केंद्र सरकारकडून इलेक्ट्रीक वाहनांवर दिली जाणारी फेम -२ सबसिडी संपली आहे. गेल्या महिनाभरापासून इलेक्ट्रीक कंपन्या त्यांच्या वाहनांवर सबसिडीची ऑफर जाहीर करत होत्या. यामध्ये आता कपात झाली आहे. १ एप्रिल म्हणजेच आजपासून ही सबसिडी बंद झाली आहे. अर्थसंकल्पात केंद्राने नवीन सबसिडी जाहीर केली होती. ती आता सुरु झाली आहे.
केंद्राने फेम-२ सबसिडी ३१ मार्च २०२४ बंद करून नवीन EMPS 2024 सबसिडी लागू केली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही सबसिडी पुढील ४ महिने चालू राहणार आहे. याव्दारे सरकार इलेक्ट्रीक दुचाकी, तीन चाकींवर सबसिडी देणार आहे.
या स्कीममध्ये सरकार ३.३३ लाख इलेक्ट्रीक स्कूटर साठी प्रत्येकी १०००० रुपयांची सबसिडी देणार आहे. म्हणजेच आधीची फेम २ सबसिडी २२००० होती ती आता १०००० रुपये झाली आहे. म्हणजेच १ एप्रिलपासून तुम्हाला ईव्ही स्कूटरसाठी जादाचे १२००० रुपये मोजावे लागणार आहेत.
तर 41,000 तीन चाकींसाठी (e-rickshaw) २५००० रुपयांची सबसिडी मिळणार आहे. तसेच यासाठी सरकार ५० हजार रुपयांचे आर्थिक पाठबळ देखील देणार आहे. या योजनेतून सरकार 3,72,215 ईव्हींसाठी ५०० कोटी रुपये देणार आहे. याची मुदत ३१ जुलै, २०२४ ठेवण्यात आली आहे. यानंतर पुन्हा सबसिडी मिळेल की नाही याची काहीच माहिती अद्याप आलेली नाहीय. कदाचित ही शेवटची सबसिडी असेल.