सावधान! मध्यरात्रीपासून FASTag कंपल्सरी लागू झाला; नसल्यास एवढ्याची पावती फाडणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 04:51 PM2021-02-16T16:51:20+5:302021-02-16T16:53:24+5:30
FASTag Mandatory from 15th February midnight : वाहनावर फास्टॅग आहे परंतू तो काम करत नाही, मग काय? केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत रविवारी घोषणा केली होती. गेल्या काही महिन्यांपासून फास्टॅगबाबत जनजागृती करण्यात येत होती. अनेकदा ही सक्ती पुढे ढकलली होती. अखेर आजपासून फास्ट्रग सर्व वाहनांना सक्तीचा झाला आहे.
आज मध्यरात्रीपासून देशभरात फास्टॅग (FASTag) सर्वांनाच लागू झाला आहे. नितीन गडकरींच्या MoRTH मंत्रालयाने याबाबतची एक अधिसूचना जारी केली आहे. मध्यरात्रीनंतर ज्या वाहनांवर FASTag लावलेला असणार नाही किंवा ज्या वाहनांवर फास्टॅग लावलेला आहे परंतू तो काम करत नाही, त्यांना जबर दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. (FASTag Mandatory from 15th February midnight.)
टोलनाक्यांवर गेल्यावर फास्टॅग नसल्यास वाहनचालकांना त्यांच्या वाहनाच्या प्रकारानुसार दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.
Government declares FASTag mandatory w.e.f midnight of 15th/16th February 2021
— MIB India 🇮🇳 #StayHome #StaySafe (@MIB_India) February 14, 2021
Any vehicle not fitted with FASTag or without valid, functional FASTag entering into FASTag lane, shall pay a fee equivalent to two times of fee applicable to that categoryhttps://t.co/hjMLNTAqLcpic.twitter.com/4RnwLTxeja
केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत रविवारी घोषणा केली होती. गेल्या काही महिन्यांपासून फास्टॅगबाबत जनजागृती करण्यात येत होती. अनेकदा ही सक्ती पुढे ढकलली होती. अखेर आजपासून फास्ट्रग सर्व वाहनांना सक्तीचा झाला आहे. NHAI याआधी 1 जानेवारीपासून कॅश टोल कलेक्शन बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुतांश वाहनचालकांकडे फास्टॅग नसल्याने ही मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविली होती. ही अखेरची मुदवाढ ठरली आहे.
1 जानेवारी 2021 जेव्हा ठरले तेव्हा त्याआधी आठवडाबर लोकांनी बंपर फास्टॅग खरेदी केले. तसेच 24 डिसेंबरला देशात 80 कोटी रुपयांहून अधिकचा टोल फास्टॅगद्वारे वसूल करण्यात आला होता. हा एकाच दिवशी फास्टॅगद्वारे टोल वसुलीचा मोठा आकडा होता. देशात कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणावर कॅशलेश ट्रान्झेक्शन झाले. याचा फायदा फास्टॅगलाही होणार आहे.
आता FASTag वापरणे सर्वच वाहनांना बंधनकारक करण्यात आले आहे. ही एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी आहे. FASTag सेव्हिंग अकाऊंट किंवा डिजिटल वॉलेटला जोडता येते. फास्टॅगद्वारे (FASTag) टोल नाक्यांवरील रांगांमधून लवकर मुक्ती मिळते असा सरकारचा दावा आहे. यामध्ये काही त्रुटी देखील आहेत. त्या दूर केल्या तर फास्टॅग फायद्याचा ठरणार आहे.
FASTag खरेदी करायचाय? जाणून घ्या मनातील समज गैरसमज...
राज्यातील काही ठिकाणी टोल नाकेच नाहीत. आपली वाहने शहराच्या किंवा पंचक्रोशीच्या बाहेर जात नाहीत, यामुळे फास्टॅग कशासाठी असा विचार करणारे बरेच आहेत. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला थर्ड पार्टी विमाही काढता येणार नाहीय. एप्रिल, 2021 पासून हा नियम लागू होणार आहे. याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे.
IMP बातमी! FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही; केंद्राचा मोठा नियम बदल
काय असतो फास्टॅग?
फास्टॅग हा एक टॅग किंवा स्टिकर आहे. ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानावर काम करते
टोलनाक्यावरील कॅमेरा स्टिकरवरचा बारकोड स्कॅन करतो आणि टोल आपोआप फास्टॅगच्या वॉलेटमधून कापला जातो
वाहनधारकांना टोलनाक्यावर खोळंबावे लागत नाही. त्यामुळे वेळ आणि इंधन यांची बचत होते. प्रवासही झटपट होतो.
Fastag : ‘फास्टॅग’ आहे ना?, वाचा नव्या तंत्रज्ञानाची इत्थंभूत माहिती