Festive Offer : फक्त 5,555 रुपयांच्या डाउन पेमेंटवर मिळतेय 'ही' बाईक, संधीचा लाभ घ्या..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 06:10 PM2022-09-28T18:10:24+5:302022-09-28T18:10:58+5:30
TVS Star city Plus : टीव्हीएस मोटर (TVS Motor) कंपनीने आपली बाईक टीव्हीएस स्टार सिटी प्लसवर (TVS Star city Plus) जबरदस्त ऑफर आणली आहे.
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये विक्री आणि ऑफर्सची स्पर्धा सुरू असते. दरम्यान, टीव्हीएस मोटर (TVS Motor) कंपनीने आपली बाईक टीव्हीएस स्टार सिटी प्लसवर (TVS Star city Plus) जबरदस्त ऑफर आणली आहे. जेणेकरून दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करता येईल. टीव्हीएस कंपनीने ग्राहकांसाठी आपल्या बाईकवर 8,000 पर्यंत पूर्ण सूट जाहीर केली आहे. जर तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या...
कंपनीची ऑफर
या सणासुदीच्या हंगामात टीव्हीएस स्टार सिटी प्लस (TVS Star city Plus) खरेदी केल्यास तुमची एकूण 8,000 रुपयांपर्यंत बचत होईल. कंपनी नवीन ऑफर अंतर्गत ग्राहकांना 2,100 रुपयांची निश्चित सूट देत आहे. दुसरीकडे, इतर स्कीमअंतर्गत तुम्ही ही बाईक 5,555 रुपयांच्या डाउन पेमेंटवर देखील खरेदी करू शकता.
इंजिन पॉवर
ही बाईक 110cc, सिंगल सिलिंडर, फ्युएल इंजेक्टेड इंजिनद्वारे चालविली जाते. हे इंजिन 7,350 rpm वर 8.08 bhp ची कमाल पॉवर आणि 4,500 rpm वर 8.7 Nm चा पीक-टॉर्क निर्माण करते. त्याचवेळी, या इंजिनमध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.
मायलेज
टीव्हीएस स्टार सिटी प्लसच्या या इंजिनमध्ये ईटीएफआय किंवा इको-थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजी देण्यात आली असून कंपनी या बाईकसाठी 84 kmpl पर्यंत मायलेज देते.
टॉप-स्पीड
टीव्हीएस स्टार सिटी प्लस बाईकच्या स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे.
किंमत
दिल्लीतील टीव्हीएस स्टार सिटी प्लसची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत 70,205 रुपये ते (टॉप एंड व्हेरिएंट) 72,955 रुपये आहे.
लोकांसाठी एक चांगला पर्याय
एकूण किंमत आणि मायलेज पाहता टीव्हीएस स्टार सिटी प्लस बाईक हा एक चांगला पर्याय आहे. तसेच, कंपनीच्या सणासुदीच्या ऑफरला बाईक घेण्याची योजना असलेल्या लोकांसाठी दिवाळी भेट म्हणता येईल. टीव्हीएसची ही बाईक लोकांच्या आवडत्या बाईक्सपैकी एक आहे आणि विशेषतः यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लक्षात घेता ही बाईक लोकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.