सायबर ट्रकचा पहिला अपघात; १७ वर्षांच्या मुलाने टोयोटा कोरोला नेऊन धडकवली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 12:50 PM2023-12-31T12:50:55+5:302023-12-31T12:51:43+5:30

एलन मस्क यांनी सायबर ट्रक मजबुत, बुटेलप्रुफ, पाण्यावर चालणारा असल्याचे दावे केले होते. याची किंमतही खूप ठेवली आहे.

First Cyber Truck Accident; A 17-year-old boy rammed a Toyota Corolla | सायबर ट्रकचा पहिला अपघात; १७ वर्षांच्या मुलाने टोयोटा कोरोला नेऊन धडकवली

सायबर ट्रकचा पहिला अपघात; १७ वर्षांच्या मुलाने टोयोटा कोरोला नेऊन धडकवली

बहुचर्चित आणि नुकत्याच आलेल्या टेस्लाच्या सायबर ट्रकचा पहिला अपघात समोर आला आहे. टेस्लाच्या सायबरट्रकला टोयोटाच्या कोरोलाने टक्कर दिली आहे. यामध्ये कोणाला दुखापत झालेली नसली तरी टोयोटाच्या कारची हालत वाईट झाली आहे. 

एलन मस्क यांनी सायबर ट्रक मजबुत, बुटेलप्रुफ, पाण्यावर चालणारा असल्याचे दावे केले होते. याची किंमतही खूप ठेवली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये हा अपघात झाला आहे. कॅलिफोर्निया हाईवे पेट्रोल (CHP) ने याची पुष्टी केली आहे. पेज मिल रोडच्या दक्षिणेकडील भागात हा अपघात झाला आहे. टेस्ला सायबरट्रकमधून तिघेजण प्रवास करत होते. तर टोयोटाची कोरोला ही कार २००९ चे मॉडेल होते. ही कार १७ वर्षांचा मुलगा चालवत होता. 

प्राथमिक तपासामध्ये कोरोला कार आधी मातीच्या ठिगाऱ्यावर जाऊन आदळली, नंतर चालकाने जेव्हा तिला पुन्हा रस्त्यावर आणले तेव्हा ती समोरून येत असलेल्या सायबर ट्रकवर आदळली. सायबर ट्रकच्या चालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. 

अपघाताच्या फोटोंवरून टेस्लाच्या सायबर ट्रकचे जास्त नुकसान झालेले दिसत नाहीय. धडकेच्या बाजुचा पत्रा थोडाफार चेपला आहे. एअरबॅग उघडलेल्या आहेत. ट्रकचा दरवाजा उघडलेला दिसत आहे. तर कोरोलाचा पुढील भाग पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. 

टेस्ला सायबर ट्रकची किंमत USD 79,990 (अंदाजे 66 लाख) पासून सुरू होते आणि USD 99,990 (अंदाजे रु 83 लाख) पर्यंत जाते. त्याचे मिड-स्पेक AWD व्हेरियंट ट्विन-मोटर सेटअपसह येते, जे 180 किमी प्रतितास ची सर्वोच्च गती प्राप्त करू शकते. सुमारे 4.1 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेते. या ट्रकची रेंज 547km (अंदाजे) आहे.

Web Title: First Cyber Truck Accident; A 17-year-old boy rammed a Toyota Corolla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.