Flex Fuel Car: Petrol-CNG विसरुन जा...मारुतीने आणली Flex-Fuel वर चालणारी WagonR; पाहा डिटेल्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 03:27 PM2022-12-13T15:27:33+5:302022-12-13T15:27:59+5:30
Flex Fuel Car: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वॅगनआरचे अनावरण करण्यात आले.
Flex Fuel WagonR in India: देशातील सर्वात मोठी कार मेकर कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने 'फ्लेक्स फ्यूलवर' चालणारी WagonR आणली आहे. फ्लेक्स फ्यूलचा अर्थ पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणावर काम करणारे इंधन. कंपनीने आपल्या WagonR चे प्रोटोटाइप मॉडेल दिल्ली येथे आयोजित SIAM (Society of Indian Automobile Manufacturers) च्या कार्यक्रमात सादर केले आहे. कारला E20 (20% इथेनॉल असलेले पेट्रोल) आणि E85 (85% इथेनॉल असलेले पेट्रोल) मधील इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालण्यासाठी डिझाइन केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वॅगनआरचे अनावरण करण्यात आले.
काय आहे Flex Fuel?
पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स-इंधनाकडे पाहिले जात आहे. याला पर्यायी इंधन असेही म्हणतात. हे पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणापासून तयार केले जाते. फ्लेक्स इंधन इंजिन पूर्णपणे पेट्रोल किंवा इथेनॉलवर देखील चालू शकतात. फ्लेक्स (Flex) हा इंग्रजी शब्द flexible पासून बनला आहे.
विविध तंत्रज्ञानांवर काम सुरू
या तंत्रज्ञानावर काम करत मारुतीने ही वॅगनआर सादर केली आहे. येत्या काही वर्षांत ही सर्वसामान्यांसाठी लाँच केली जाईल. मारुती सुझुकी सध्या इलेक्ट्रिक, हायब्रिड इलेक्ट्रिक, सीएनजी, बायो-गॅस, इथेनॉल, फ्लेक्स-इंधन यासह विविध तंत्रज्ञानावर काम करत आहेत. कंपनीने मार्च 2023 पर्यंत सर्व मॉडेल्स E20 इंधन अनुरूप बनवण्याची घोषणा केली आहे.
गडकरी यांनी Flex Fuelचे फायदे सांगितले
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेचा सामना करण्यासाठी देशाने फ्लेक्स इंधन आणि ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. देशातील 40 टक्के प्रदूषणाचे कारण पेट्रोल आणि डिझेलसारखे इंधन आहे. त्यामुळे भविष्यात पर्यायी इंधन वापरणे काळाची गरज आहे.