अखेर फोर्स इंडिया एफ 1 ची मल्ल्याच्या तावडीतून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 08:24 AM2018-08-09T08:24:53+5:302018-08-09T08:26:25+5:30
फॉर्म्युला 1 चा चालक लांस स्ट्रोल याचे वडील नेतृत्व करत असलेल्या गुंतवणूकदारांच्या एका गटाने या कंपनीचा ताबा घेतला आहे
नवी दिल्ली : भारतातील बँकांना सुमारे 9 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्याच्या फोर्स इंडिया एफ 1 या कार रेसिंग कंपनीचा ताबा दुसऱ्या गुंतवणूकदारांकडे गेल्यानने जवळपास 405 कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. फॉर्म्युला 1 चा चालक लांस स्ट्रोल याचे वडील नेतृत्व करत असलेल्या गुंतवणूकदारांच्या एका गटाने ही कंपनी विकत घेतली आहे.
विजय मल्ल्याने विविध बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज उचलले होते. मात्र, त्या पैशांचा अनावश्यक रित्या वापर केल्याने त्याची किंगफिशर एअरलाईन्स डब्यात गेली आहे. या कंपनीचे कर्मचाऱ्यांचा पगार होत नव्हता. कंपनीही बंद पडल्याने बँकांनी मल्ल्याला दिवाळखोर घोषित केले होते. या दरम्यान मल्ल्या याने लंडनला पलायन केले होतो. यामुळे मल्ल्याच्या इतर कंपन्याही अखेरची घटका मोजत आहेत. यात फोर्स इंडिया एफ 1 ही कार रेसिंग कंपनीही होती.
जुलैमध्ये फोर्स इंडिया एफ 1 चा चालक सर्जिओ याने न्यायालयात धाव घेतली होती. याद्वारे इतर गुंतवणुकदारांकडे कंपनी सोपविण्याची विनंती केली होती. न्यायालयाने मल्ल्याविरोधात निर्णय देत कंपनी लॉरेन्स स्ट्रोल यांच्या ताब्यात दिली आहे. यामुळे मल्ल्याची मालकी संपुष्टात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती फोर्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओत्मर झाफ्नेर यांनी दिली.