Ford आता ‘या’ देशात सुरू करणार ४ प्लांट; भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 12:11 PM2021-09-29T12:11:40+5:302021-09-29T12:15:18+5:30

आता इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक भर देत असल्याचे फोर्डने म्हटले आहे.

ford announces big investment of 11 billion in america to strengthen ev production | Ford आता ‘या’ देशात सुरू करणार ४ प्लांट; भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर मोठा निर्णय

Ford आता ‘या’ देशात सुरू करणार ४ प्लांट; भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर मोठा निर्णय

Next
ठळक मुद्देफोर्डचा एका बड्या देशात ४ नवीन प्लांट सुरू करण्याचा निर्णययासाठी ११.४ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणारयानंतर ११ हजार नवीन रोजगार निर्माण होतील

नवी दिल्ली: अलीकडेच फोर्ड कंपनीने भारतातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढावले असून, ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र दुसरीकडे भारतातील गाशा गुंडाळल्यानंतर फोर्डने जागतिक स्तरावरील एका बड्या देशांमध्ये ४ नवीन प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी ११.४ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. (ford announces big investment of 11 billion in america to strengthen ev production)

फोर्ड मोटरने मोठी घोषणा करत आपल्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन प्रमाण आणि क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकेत ११.४ अब्ज डॉलर (सुमारे ८४,६१४ कोटी रुपये) गुंतवणार असल्याचे म्हटले आहे. या गुंतवणूकीतून अमेरिकेत सुमारे ११ हजार नवीन रोजगार निर्माण होतील, असेही कंपनीने सांगितले. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन कंपनी अमेरिकेत ४ नवीन प्लांट उभारण्याची तयारी करत आहे. 

इलेक्ट्रिक ट्रक आणि बॅटरी बनवणार

फोर्डने सांगितले की, आता इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक भर देत आहे आणि या कारखान्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहने तयार केली जातील. विशेषतः त्यात इलेक्ट्रिक ट्रक आणि बॅटरी बनवल्या जातील. फोर्ड मोटर त्याच्या दक्षिण कोरियन भागीदार एसके इनोव्हेशनसह या चार प्लांट्सचा विस्तार करेल. एकूण ११.४ अब्ज डॉलर गुंतवणुकीत फोर्ड मोटर ७ अब्ज डॉलर गुंतवेल, तर उर्वरित निधी एसके इनोव्हेशनकडून येईल, असे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, भारतातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसरीकडे, अमेरिकेत एवढ्या मोठ्या गुंतवणुकीची घोषणा फोर्डने केली आहे. विशेष म्हणजे फोर्ड कंपनीने वाढत्या तोट्याचे कारण देत भारतातील उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील उत्पादन प्लांट बंद करण्याच्या निर्णयामुळे चेन्नई आणि गुजरातमधील फोर्डच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांवर रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे.
 

Web Title: ford announces big investment of 11 billion in america to strengthen ev production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.