फोर्ड संकटात! तब्बल दोन अब्ज डॉलरचा तोटा; नुकसान पाच अब्जांवर जाण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:55 PM2020-04-29T13:55:26+5:302020-04-29T13:57:14+5:30
फोर्डला दक्षिण अमेरिकेमध्ये काही फायदा झाला आहे. मात्र, जगभरात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
न्यूयॉर्क : जागतिक ख्यातीची वाहननिर्माता कंपनी फोर्ड मोठ्या संकटात सापडली आहे. पहिल्या तिमाहीमध्ये फोर्डला २ अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागले आहे. मंगळवारी कंपनीने तिच्या गुंचतवणूकदारांना सांगितले की, चालू तिमाहीमध्येही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
गेल्या तिमाहीमध्ये कंपनीला ५३२ मिलियन डॉलरचा तोटा झाला होता. या तुलनेत या तिमाहीमध्ये व्याज, कर आणि विशेष वस्तूंमुळे हे नुकसान ५ अब्ज डॉलरपर्यत होण्याची शक्यता आहे. फोर्डला दक्षिण अमेरिकेमध्ये काही फायदा झाला आहे. मात्र, जगभरात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. कंपनीने सांगितले एकट्या उत्तर अमेरिकेमध्ये १.९ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.
कंपनीटच्या उत्पन्नामध्ये १५ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे हे उत्पन्न ३४.३ अब्ज डॉलरवर आले आहे. कार विक्रीमध्ये २१ टक्क्यांची घट झाल्याने हा परिणाम झाला आहे. २.२ अब्ज डॉलरचा तोटा होवूनही कंपनीने अतिरिक्त कर्ज घेतल्याने कंपनीकडे ३४ अब्ज डॉलर उरले असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीने सांगितले कारण
सध्याचा काळ हा सर्व ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी आव्हानांचा काळ आहे. जगभरातील सर्वच कंपन्यांना उत्पादन प्रकल्प बंद करवे लागले आहेत. तसेच लॉडाऊनमुळे लोकांना घरातच रहावे लागत असल्याने जवळपास सर्वच डिलरशीप बंद आहेत. अनेकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तर अनेकांची पगार कपात झाली आहे. यामुळे ग्राहकांची कार खरेदी करण्याची इच्छा आणि गरज दोन्हींमध्ये घट झाली असल्याचा परिणाम विक्रीवर झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार
हॅलो, मी ज्योतिरादित्य शिंदे बोलतोय!; निवडणूक चिंतेमुळे राजकीय वातावरण तापले
देशासाठी काहीपण! आजारी बालकासाठी रेल्वेने १५०० किमींचे अंतर कापत १ लीटर दूध पोहोचवले